आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे पुरावे आहेत ? अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर एक्स – बॉयफ्रेंडच्या अडचणीत वाढ
अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर एक्स - बॉयफ्रेंडच्या अडचणीत वाढ; गेल्या एक महिन्यांपासून अभिनेता तुरुंगात, वकिलांना जामिनासाठी अर्ज केला, पण...
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (tunisha sharma) हिच्या आत्महत्येनंतर अभिनेता आणि एक्स – बॉयफ्रेंड शिझान खान (sheezan khan) याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणी शिझान खान याला मोठा झटका लागला आहे. अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिझान खान याची जामिन याचिका फेटाळली आहे त्यामुळे अभिनेत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान शिझान खान याला तात्काळ जामिन देण्यास नकार दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शिझान खान याच्या लिगल टीमला सर्वप्रथम जामिन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शिझान खान याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये शिझानला जामिन मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तर दुसऱ्या याचिकेत अभिनेत्याला तात्काळ जामिन मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा तात्काळ जामिन अर्ज फेटाळला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान अनेक प्रश्न देखील विचारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान महत्त्वाच्या पुराव्याविषयी विचारणा केली. तपासा दरम्यान असे काही पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे माहिती पडेल अभिनेत्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे? आता याप्रकरणी पुढे काय होणार ? याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, तुनिषा हिने एक्स – बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तुनिषला हिला मृत घोषित केलं. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. तुनिषा हिने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी जीवन प्रवास संपवला.
तुनिषाच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या आई वनिता शर्मा यांनी शिझान याच्यावर गंभीर आरोप केलं. त्यानंतर अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली. २४ डिसेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने गळफास घेवून आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर शिझानच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
तुनिषा शर्मा हिच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केल्यानंतर शिझानच्या कुटुंबियांनी देखील वनिता शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले. तुनिषा हिची आई लेकी पैसे देत नसल्याची तक्रार शिझानच्या कुटुंबियांनी केले. तुनिषा आत्महत्या प्रकरणात गेल्या एक महिन्यापासून अभिनेता तुरुंगात आहे. त्यामुळे आता तुनिषा आत्महत्या प्रकरणी अभिनेत्याला दिलासा मिळेल, की त्याच्या अडचणींमध्ये वाढ होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.