AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Case: मृत्यूच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी तुनिशाला आणलं होतं रुग्णालयात; डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

तुनिशाला रुग्णालयात आणल्यानंतर नेमकं काय घडलं? डॉक्टर म्हणाले "तिच्या शरीराची हालचाल.. "

Tunisha Case: मृत्यूच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी तुनिशाला आणलं होतं रुग्णालयात; डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
Tunisha Sharma
| Updated on: Dec 28, 2022 | 8:15 AM
Share

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या पार्थिवावर मंगळवारी भाईंदर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोपी शिझान खानची आई आणि बहीणही उपस्थित होती. तुनिशाने शनिवारी दुपारी वसई इथल्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघं ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत एकत्र काम करत होते. आता एफ अँड बी मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयाचे डॉक्टर सुरेंद्र पाल यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “तुनिशाचा मृत्यू संध्याकाळी 4.20 वाजता झाला होता आणि तिला मृत्यूच्या पाच ते सात मिनिटांपूर्वी रुग्णालयात आणलं होतं. सेटवरील उपस्थित काही सहकारी तिला रुग्णालयात घेऊन आले होते.”

तुनिशाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची प्रकृती कशी होती, याविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, “तिच्या शरीराची हालचाल होत नव्हती आणि पल्सही नव्हती. ती श्वाससुद्धा घेत नव्हती, डोळ्यांच्या पापण्यांचीही हालचाल नव्हती. या सगळ्या मृत्यूच्या खुणा असतात, ज्यावर नंतर ईसीजीने शिक्कामोर्तब केला. तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं की शूटिंगदरम्यान तिने स्वत:ला एका रुममध्ये बंद करून घेतलं होतं.”

“सेटवरील उपस्थित लोकांनी जेव्हा रुमचा दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर कुठल्याच खुणा किंवा जखम नव्हती”, असंही त्यांनी सांगितलं. तुनिशाच्या मृतदेहावर जे. जे. रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं.

मृत्यूनंतरचा पहिला CCTV व्हायरल

मृत्यूनंतर तुनिशाचा पहिला व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी तुनिशाला उचलून रुग्णालयात नेताना दिसत आहेत. प्रॉडक्शन टीमचा सदस्य तुनिशाला उचलून घेऊन जात आहे. या व्हिडीओमध्ये शिझानसुद्धा पहायला मिळत आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.