अभिनेत्रीच्या निधनानंतर आईची प्रकृती खालावली; दोन वेळा रुग्णालयात दाखल
अभिनेत्रीच्या निधनाला दोन महिने झाले असले तरी; आई आजही विचारते, 'शुटिंग संपली का... ती घरी आली का...', अभिनेत्रीच्या निधनानंतर तिची आई पूर्णपणे कोलमडली...
Tunisha Sharma Mother : आई आणि लेकीचं नातं फार घट्ट असतं. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा एका मुलीसाठी आई ही फक्त आई नसून एक खास मैत्रीण देखील असते. पण टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनानंतर तिची आई पूर्णपणे कोलमडली आहे. अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं. तुनिषाने २४ डिसेंबर २०२२ रोजी आत्महत्या केली. पण लेकीच्या आठवणीत आई मात्र आजही रडत असते. अभिनेत्रीच्या निधनानंतर तुनिषाच्या आईला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशी महिती तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी दिली आहे.
एका मुलाखतीत पवन शर्मा म्हणाले, ‘माझी बहीण आजही विचारत असते, तुनिषाचं शुटं संपलं का? ती घरी येण्यासाठी निघाली का? सर्व काही ठिक सुरु आहे ना? जास्त तणाव आल्यामुळे तिला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आजही माझ्या बहिणीची प्रकृती ठिक नाही. माझी बहीण रात्री झोपण्यासाठी झोपेच्या गोळ्या खात असते..’
View this post on Instagram
पुढे पवन शर्मा म्हणाले, ‘तुनिषाची आई वनिता शर्मा आता गावी गेल्या आहेत. घरी आम्ही तुनिषाची आईला मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवतो. कारण जर शिझान याला जामीन मंजूर झाला आहे, असं कळाल्यानंतर तुनिषाच्या आईला आखणी त्रास होईल… काही न्यायालयीन काम असेल तरच तुनिषाची आई मुंबईमध्ये येईल…’ असं देखील पवन शर्मा म्हणाले.
मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिषा हिच्या आईने शिझान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुनिषा शर्मा हिच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी शिझान याला अटक केली. शिझान याला अटक झाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी देखील तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले. तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान याच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. पण आता अभिनेता तुरुंगातून बाहेर आला आहे.
शिझान खान जवळपास ७० दिवस तुरुंगात होता. तुनीषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याचा जामीन मंजूर झाला. ५ मार्च रोजी शिझान याची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे.