‘तीन महिन्यात मी तिला…’, अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर आईवर गळा दाबल्याचे आरोप; अखेर सत्य समोर
लेकीचा गळा दाबल्याचा आरोप केल्यानंतर आईचं स्पष्टीकरण; अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ
Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने एक्स-बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खानच्या मेकअप रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी शिझानला १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिशाची आई वनीता शर्मा यांनी शिझानवर गंभीर आरोप केले. अभिनेत्रीच्या आईने आरोप केल्यानंतर, शिझानच्या कुटुंबियांनी तुनिशाच्या आईवर लेकीचा गळा दाबल्याचा आणि तिला पैसे न देण्याचा आरोप केला.
शिझानच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केल्यानंतर वनीता यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. तुनिशाच्या आई म्हणाल्या, ‘मी शिझानला सोडणार नाही. मी याठिकाणी नाती समजण्यासाठी नाही आली, मला न्याय हवाय. तुनिशा माझ्यासाठी सर्वकही होती. शिझान आणि त्याचं पूर्ण कुटुंब यामध्ये सहभागी आहे. गेल्या तीने ते चार महिन्यांपासून तुनिशाचं शिझानच्या कुटुंबासोबत अधिक नातं घट्ट झालं होतं. ‘
‘पूर्ण कुटुंबाने तुनिशाचा वापर केला. मी तुनिशाला पैसै देत नसल्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले. गेल्या तीन महिन्यात मी तुनिशाला ३ लाख रुपये दिले होते. ते तीन लाख तिने कशासाठी खर्च हे मला माहिती नाही. तुम्ही माझं बँक स्टेटमेंट पाहू शकता.’ असं म्हणत तुनिशा शर्माच्या आईने शिझानच्या कुटुंबाने लगावलेले गंभीर आरोप फेटाळले आहेत.
वनीता शर्मा पुढे म्हणाल्या, ‘शिझान ड्रग्सचं सेवन करायचा आणि तुनिशाला देखील ड्रग्स घेण्यासाठी बळजबरी करायचा. यामुळे तुनिशाने स्मोक करणं देखील सुरु केलं होतं. असं म्हणत तुनिशाच्या आईने मला सर्व रिपोर्ट हवे असल्याची मागणी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तुनिशाच्या आईने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रकरण कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिझानला दिलासा नाहीच… तुनिशा शर्माने वयाच्या २० व्या वर्षी आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिझान खानच्या जामिन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. पण अभिनेत्याला दिलासा मिळालेला नाही. आता शिझानच्या जामिन अर्जावर ९ जानेवारी म्हणजे सोमवारी सुनावणी होणार आहे.