Tunisha Sharma: तुनिशाच्या मालिकेचा धमाकेदार नवीन प्रोमो प्रदर्शित; ‘या’ अभिनेत्याने घेतली शिझानची जागा
मालिकेतील दोन्ही मुख्य कलाकार नसल्याने ही मालिका काही दिवस बंद होती. अशातच निर्मात्यांनी आता ही मालिका नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेत आता शिझानची जागा दुसऱ्या अभिनेत्याने घेतली आहे.
मुंबई: सोनी सब वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेची मुख्य अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सहअभिनेता शिझान खानला पोलिसांनी अटक केली. मालिकेतील दोन्ही मुख्य कलाकार नसल्याने ही मालिका काही दिवस बंद होती. अशातच निर्मात्यांनी आता ही मालिका नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत आता शिझानची जागा दुसऱ्या अभिनेत्याने घेतली आहे. त्याचा नवा धमाकेदार प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
शिझानच्या जागी निर्मात्यांनी नव्या अभिनेत्याची निवड केली आहे. या नव्या अभिनेत्यासोबतच मालिकेचा नवीन सिझन अर्थात चाप्टर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सब टीव्हीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या नव्या सिझनचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
‘कुछ बडा आ रहा है’ असं कॅप्शन या प्रोमो व्हिडीओ दिलं आहे. अली बाबा- एक अनदेखा अंदाज चाप्टर 2, सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा प्रोमो
Something big coming up, stay tuned?
Dekhiye Television’s Biggest Family Entertainer, Ali Baba – Ek Andaaz Andekha Chapter 2, Mon-Sat raat 8 baje, sirf Sony SAB par.#AliBaba #AliBabaOnSAB #EkAndaazAndekha #ChapterTwo pic.twitter.com/NfwBxlAJFJ
— SAB TV (@sabtv) January 16, 2023
मालिकेच्या या नव्या चाप्टरमध्ये तुनिशाचा मित्र आणि अभिनेता अभिषेक निगम शिझानची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.
दुसरीकडे तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. वसई कोर्टाने शिझानच्या जामिनाची याचिका फेटाळली आहे. शिझान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तुनिशाच्या आईने शिझानवर फसवणुकीचा आरोप केला आहे. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. शिझान दुसऱ्या मुलींच्याही संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडचीही चौकशी पोलिसांनी केली. तर दुसरीकडे तुनिशा डेटिंग ॲपवरून अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती. निधनाच्या दिवशी तिने अलीशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला होता, अशीही माहिती समोर आली आहे.