Charu Asopa | घटस्फोटनंतर एका महिन्याच चारू असोपा हिने मागितली राजीव सेन याला मदत, थेट अश्रू अनावर आणि
गेल्या काही दिवसांपासून चारू असोपा आणि राजीव सेन हे सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. विशेष म्हणजे चारू असोपा हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे राजीव याच्यावर केले. सोशल मीडियावर दोघेही नेहमीच सक्रिय असतात.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सुरूवातीला चारू असोपा हिने राजीव सेन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत सर्वांना मोठा धक्का दिला. इतकेच नाही तर राजीव सेन याचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा गंभीर दावा चारू असोपा (Charu Asopa) हिने केला. त्यानंतर काही दिवसांमध्येच राजीव सेन यानेही एका मोठ्या टीव्ही अभिनेत्यासोबत चारू असोपा हिचे अफेअर सुरू असल्याचे देखील म्हटले, यांचा वाद टोकाला गेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून चारू असोपा आणि राजीव सेन हे सतत एकमेकांवर आरोप करत होते. काही लोकांनी यांचा हा फक्त नाटक सुरू असल्याचे देखील म्हटले.
चारू असोपा आणि राजीव सेन यांचा घटस्फोट हा काही दिवसांपूर्वीच झालाय. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत घटस्फोट लवकरच होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच चारू असोपा हिने सांगितले होते. चारू असोपा आणि राजीव सेन हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या खासगी आयुष्यामध्ये नेमके काय सुरू याची माहिती ते सतत आपल्या चाहत्यांना देतात.
नुकताच चारू असोपा हिने कैसा है ये रिश्ता अंजाना या मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केलीये. विशेष म्हणजे या मालिकेत चारू असोपा ही महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच चारू असोपा हिने ब्लाॅग शेअर केलाय. या ब्लाॅगमध्ये चारू असोपा ही रडताना देखील दिसत आहे. चारू असोपा ही या ब्लाॅगमध्ये खूप जास्त भावनिक झाल्याचे बघायला मिळाले.
चारू असोपा हिने तिच्या आगामी मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केलीये. मात्र, मालिकेच्या शूटिंगमुळे तिला तिच्या मुलीपासून दूर राहण्याची वेळ आलीये. पहिल्यांदाच चारू असोपा ही तिच्या मुलीपासून दूर आहे. इतकेच नाही तर मुलीची आठवण काढत तिने चक्क राजीव सेन याला देखील मदत मागितली आहे.
चारू असोपा हिने राजीव सेन याला म्हटले की, मला मुलीला मालिकेच्या सेटवर आणायचे आहे. मात्र, मालिका नवीन असल्याने तिला सेटवर एक रूम मिळू शकत नाहीये. या व्हिडीओमध्ये चारू असोपा हिने मी सकाळी निघाल्यानंतर माझी मुलगी झोपल्याचे देखील म्हटले. मला खूप जास्त तिची आठवण येत असल्याचे म्हणत चारू असोपा ही रडण्यास लागली.