अभिनेत्रीने 9 वर्षांनी परत केले प्रेम, दुसऱ्याही पतीने दिला धोका, आता सर्व आठवणी….
टीव्ही अभिनेत्री दलजीत काैर हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. लवकरच अभिनेत्री घटस्फोट घेत आहे. दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. मात्र, दलजीत काैरचे हे दुसरे लग्न फार काळ टिकू शकले नाही. सोशल मीडियावर दलजीत काैर सक्रिय दिसत आहे.
टीव्ही अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. दहा महिन्यांपूर्वीच दलजीत काैर हिने केन्याचा व्यावसायिक निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. निखिल आणि दलजीत काैर यांचे हे दुसरे लग्न होते. दलजीत काैर हिचे पहिले लग्न अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले होते. विशेष म्हणजे दलजीत काैर आणि शालिनचा एक मुलगा देखील आहे. अनेक वर्षांपूर्वीच दलजीत काैर आणि शालिन भनोट यांचा घटस्फोट झाला. आता निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर दलजीत काैर ही केन्यामध्ये शिफ्ट झाली होती. भारतामध्ये अत्यंत खास पद्धतीने दलजीत काैर आणि निखिल यांनी लग्न केले.
लग्नाला अवघे दहा महिने पूर्ण होत नाहीत, तोवरच दलजीत काैर ही आपल्या मुलाला भारतात घेऊन परतलीये. त्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. दलजीत काैरआणि निखिल पटेल यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. दलजीत काैर हिने थेट म्हटले की, निखिल पटेल याच्या विवाहबाह्य संंबंध आहेत.
यानंतर निखिल पटेल याने हा विवाहच मान्य करण्यास नकार दिला आणि केन्यामध्ये दलजीत काैरचे असलेले सामना घेऊन जाण्यास त्याने सांगितले. हेच नाही तर तिला कायदेशीर नोटीस देखील निखिल पटेल याने पाठवली. निखिल पटेल आणि दलजीत काैर यांचा घटस्फोट लवकरच होणार हे जवळपास स्पष्टच आहे. सध्या दलजीत काैर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.
दलजीत काैर हिने सोशल मीडियावर नुकताच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबतच तिने लिहिले की, नऊ वर्षांनंतर प्रेमात पडण्याची हिंमत केली होती. यामध्ये दलजीत काैर आणि निखिल पटेल यांचे पाय दिसत आहेत. दोघांनीही सेम टॅटू काढल्याचे यामध्ये दिसत आहे. या टॅटूमुळे दुसऱ्यांदा प्रेमात पडण्याची हिंमत आल्याचे तिने म्हटले. टॅटूमध्ये निखिल पटेल आणि दलजीत काैर यांच्या लग्नाची तारीख दिसत आहे.
आता दलजीत काैर ही हा टॅटू मिटवणार आहे. दलजीत काैर ही निखिल पटेल याच्यासोबत तुटलेल्या लग्नामुळे धक्क्यात आहे. आपण किती विश्वास करून दुसऱ्यांदा प्रेमात पडल्याचे बोलताना दलजीत काैर ही दिसत आहे. दलजीत काैर ही सतत निखिल पटेल याच्यासोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच निखिल पटेल हा भारतात आपल्या बर्थडे साजरा करण्यासाठी गर्लफ्रेंडसोबत पोहोचला होता.