ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खान हिने शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, अभिनेत्रीने आपले…
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खान हिने एक पोस्ट शेअर करत काही दिवसांपूर्वीच अत्यंत मोठा खुलासा केला. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. चाहते हे सतत तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. हिना खानने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मलिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिना खान बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. हिना खान कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हिना खानला खरी ओळख ही ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून मिळालीये. या मालिकेत हिना ही अक्षराच्या भूमिकेत होती. आजली बरेच लोक हिना खानला अक्षराच्या नावानेच ओळखतात.
हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. हिना खानने म्हटले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय आणि तिच्यावर उपचार सुरू असून ब्रेस्ट कॅन्सर तिसऱ्या टप्यात आहे. हिना खान हिच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली.
हिना खान ही कीमोथेरेपी घेत आहे. मात्र, कीमोथेरेपीच्या अगोदर हिना खान हिने आपले केस कट केले. आता हिना खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिचे अगोदरचे मोठे केस दिसत आहेत. लगेचच तिने सध्याच्या लूकचा व्हिडीओ पुढे दाखवला आहे. ज्यामध्ये तिने केस कट केल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
आता हिना खान हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हिना खान हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खानला ही ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून सतत सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे. स्वत:चा विश्वास वाढवताना देखील हिना खान दिसत आहे.
हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, काहीही झाले तरीही मी हार मानणार नाहीये. हिना खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या शरीरावर काही जखमा देखील दिसत होत्या. हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर तिची आई रडताना दिसली होती. हिना खान हिने केस कट करतानाचाही व्हिडीओ शेअर केला होता.