आधी लग्नाचा खोटा ड्रामा, नंतर शारीरिक-मानसिक छळ; अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप
लग्नानंतर आशिषने तिला सार्वजनिकरित्या पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. सोशल मीडियावरसुद्धा त्याने काजलसोबतचे कोणतेच फोटो पोस्ट केले नाहीत. आशिषच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काजलसोबत त्याचा कोणताच फोटो नाही आणि त्याने लग्नाबद्दलही काहीच पोस्ट केलं नव्हतं.
मुंबई: झी टीव्ही वाहिनीवरील ‘मिठाई’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता आशिष भारद्वाज याच्यावर ‘चीकू’ फेम अभिनेत्री काजल चोनकरने गंभीर आरोप केले आहेत. काजलचं असं म्हणणं आहे की तिने सहा महिन्यांपूर्वी आशिषशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर आशिषने तिला सार्वजनिकरित्या पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. सोशल मीडियावरसुद्धा त्याने काजलसोबतचे कोणतेच फोटो पोस्ट केले नाहीत. आशिषच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काजलसोबत त्याचा कोणताच फोटो नाही आणि त्याने लग्नाबद्दलही काहीच पोस्ट केलं नव्हतं.
टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत काजलने आशिषवर बरेच आरोप केले आहेत. आशिषला हे लग्न स्वीकारायचं नाही, असं तिने म्हटलंय. आशिषला घटस्फोटो द्यायचा आहे, मात्र मी त्याला घटस्फोट देणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं आहे. “माझ्यासोबत हे सर्व चुकीचं घडलंय. आम्ही बऱ्याच काळापासून एकत्र राहत होतो. एकमेकांना डेट करताना आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. माझ्याशी लग्न करेल, असं खोटं आश्वास त्याने मला दिला”, असं काजोल म्हणाली.
आशिषविरोधात दाखल केला FIR
काजलने आशिषविरोधात एफआयआर दाखल केली होती. मात्र त्यानंतर त्याचे कुटुंबीय तिची मनधरणी करण्यासाठी आले. दिल्लीत तिने आशिषसोबत कोर्ट मॅरेज केलं. जेव्हा काजलने त्याला सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं तेव्हा आशिष आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर दबाव टाकू लागले. एफआयआर मागे घेण्यासाठी आशिषने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचाही आरोप काजलने केला आहे. 7 फेब्रुवारी रोजी आशिष घर सोडून गेला आणि त्याने फोन उचलणं बंद केलं.
“त्याच्याविरोधातील खटला बंद करण्यासाठी हे सर्व नाटक सुरू आहे. केस बंद करण्यासाठीच लग्नाचं नाटक केलं गेलं आणि नंतर तो मला घटस्फोट देणार होता. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत आहेत. मात्र माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असा खोटा आरोप आशिषचे कुटुंबीय करत आहेत. मी एकदम व्यवस्थित आहे आणि नुकतीच उटीमध्ये शूटिंग पूर्ण करून आले”, असं काजलने सांगितलं. याप्रकरणी आशिषशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या संपर्क होऊ शकला नाही.