घटस्फोटीत अभिनेत्यासोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, मोठा खुलासा, म्हणाली, माझ्या आयुष्यातील..
अभिनेत्री निधी सेठ हिने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केलाय. निधी सेठ हिचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले आहेत. हेच नाही तर पहिल्यांदाच आपल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलताना निधी सेठ ही दिसली आहे. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही तूफान रंगताना दिसत आहे.
अभिनेत्री निधी सेठ ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. निधी सेठच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अभिनेत्रीने थेट मुंबई देखील सोडली आहे. निधी सेठ हिने काही हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. निधी सेठचा चाहतावर्गही मोठा आहे. आता अभिनेत्रीने हे स्पष्ट केले की, तिला आता तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष्य केंद्रित करायचे आहे. चांगले काम मिळाले तर आपण मुंबईमध्ये परतणार असल्याचेही अभिनेत्रीकडून स्पष्ट करण्यात आलंय. घटस्फोटानंतर अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.
निधी सेठ हिने 2021 मध्ये अभिनेता करण वीर याच्यासोबत लग्न केले. लग्नाला दोन वर्षे पूर्ण होताच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हेच नाही तर यांच्यामधील वाद इतका जास्त वाढला की, त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता नुकताच निधी सेठ हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना निधी सेठ ही दिसलीये.
निधी सेठ ही थेट म्हणाली की, मी करण वीर याच्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आणि आता याचा पश्चाताप होत आहे. ती आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. पुढे निधी सेठ म्हणाली, ज्यावेळी माझ्या लक्षात आले की, आपण मोठी चूक केली, त्याचवेळी मी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मी बाहेरही पडले.
निधी सेठ म्हणाली, या वाईट काळात मला माझ्या कुटुंबियांनी खूप सपोर्ट केला आणि त्याची मला गरजही खूप होती. सध्या निधी ही बेंगलुरुमधूनच काम करत आहे. आता निधी सेठ ही आपल्या आयुष्यात पुढे गेलीये. काही दिवसांपूर्वीच निधी सेठने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा खास फोटो शेअर केला. निधी सेठसोबत लग्न करण्याच्या अगोदर करण वीरचे लग्न झाले होते.
करण वीरने 2009 मध्ये आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर त्यांचा घटस्फोट 2018 मध्ये झाला. त्यानंतर करण वीरने निधी सेठ हिला डेट करण्यासा सुरूवात केली आणि त्यांनी 2021 मध्ये लग्न केले. मात्र, यांचेही लग्न फार काळ टिकू शकले नाही. आता अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले.