हेल्मेटचेही झाले तुकडे-तुकडे; अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?

सुचंद्राच्या अपघातप्रकरणी पोलिसांनी लॉरी चालवणाऱ्या ड्राइव्हरला ताब्यात घेतलं आहे. सुचंद्राने काही बंगाली मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. बिस्वरुप बंद्योपाध्याय आणि मोहना मैती यांच्या 'गौरी इलो' या मालिकांमध्ये ती झळकली होती.

हेल्मेटचेही झाले तुकडे-तुकडे; अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?
Suchandra DasguptaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 1:58 PM

कोलकाता : प्रसिद्ध बंगाली टेलिव्हिजन अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताने रस्ते अपघातात आपला जीव गमावला. सुचंद्राच्या अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शूटिंगनंतर ती घरी परतत होती. त्यावेळी हा अपघात झाला. कोलकातामधील पानीहाटी याठिकाणी सुचंद्रा राहते. शूटिंगनंतर घरी जाण्यासाठी तिने एका ॲपवरून बाईक बुक केली होती. घोषपारा याठिकाणी बारानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिचा अपघात झाला. यावेळी सुचंद्राने हेल्मेट घातला होता. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की तिच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते.

नेमकं काय घडलं?

सुचंद्राने बाईक बुक केल्यानंतर ती घरी जाण्यासाठी चालकाच्या मागे बसली होती. अचानक त्यांच्या बाईकसमोर एक सायकलस्वार आला. त्याला वाचवण्यासाठी बाईक चालवणाऱ्याने अचानक ब्रेक मारला. यावेळी सुचंद्राचा तोल गेला आणि ती बाईकवरून थेट खाली रस्त्यावर पडली. बाईकपासून एक फूटाच्या अंतरावर ती पडली. त्याचवेळी अचानक मागून येणाऱ्या लॉरीने सुचंद्राला चिरडलं. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, यावेळी सुचंद्राच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते. जवळच्या लोकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिचे प्राण वाचू शकले नाही.

सुचंद्राच्या अपघातप्रकरणी पोलिसांनी लॉरी चालवणाऱ्या ड्राइव्हरला ताब्यात घेतलं आहे. सुचंद्राने काही बंगाली मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. बिस्वरुप बंद्योपाध्याय आणि मोहना मैती यांच्या ‘गौरी इलो’ या मालिकांमध्ये ती झळकली होती. सुचंद्राने मोजक्याच भूमिका साकारल्या होत्या, मात्र यांमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. देशभरातील रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युट्यूबर अमित मंडलचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.