‘3 इडियट्स’मधील लायब्रेरियन दुबे यांच्या निधनाच्या 6 महिन्यांनी पत्नीच्या आयुष्यात परतलं प्रेम

'थ्री इडियट्स' या चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निधन झालं. त्यांच्या निधनाच्या सहा महिन्यांनंतर पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री सुझान बर्नर्टच्या आयुष्यात नवीन प्रेम परतलं आहे.

'3 इडियट्स'मधील लायब्रेरियन दुबे यांच्या निधनाच्या 6 महिन्यांनी पत्नीच्या आयुष्यात परतलं प्रेम
'3 इडियट्स'मधील 'लायब्रेरियन'ची पत्नी करणार दुसरं लग्न? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:03 AM

मुंबई : 19 मार्च 2024 | आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निधन झालं होतं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अखिल यांनी प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केलं होतं. पतीच्या निधनानंतर त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. आता सुझानच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एण्ट्री झाली आहे. तिने खुद्द सोशल मीडियाद्वारे रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. सुझान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा तिने केला आहे.

सुझानने ज्या व्यक्तीसोबत फोटो पोस्ट केला आहे, त्याचं नाव अर्जुन हरदास आहे. अर्जुन हे बिझनेसमन असून ते दिल्लीचे आहेत. सुझान आणि अर्जुन यांची पहिली भेट दिल्लीतच एका मित्राच्या पार्टीदरम्यान झाली. पती अखिलच्या निधनानंतर सुझानने बाहेर जाणं, लोकांना भेटणं बंद केलं होतं. ती फक्त कामाच्या निमित्ताने लोकांना भेटायची. स्वत:ला एकाकीपणातून बाहेर काढण्यासाठी तिने दिल्लीला फिरायचं ठरवलं होतं. त्याचवेळी तिच्या एका मित्राने पार्टी ठेवली होती. या पार्टीतच सुझानची भेट अर्जुनशी झाली.

हे सुद्धा वाचा

पहिल्या भेटीनंतर सुझान आणि अर्जुन यांच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सुझानचा पती अखिल मिश्रा यांना ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय अखिल यांनी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांनी भंवर, उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर डॉन, हजारों ख्वाहिशें, गांधी माय फादर, शिखर, थ्री इडियट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.

अखिल यांनी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी 3 फेब्रुवारी 2009 रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर 30 सप्टेंबर 2011 रोजी त्यांनी पारंपरिक विवाहपद्धतीनुसार पुन्हा लग्न केलं होतं. अखिल यांच्या निधनानंतर सुझान पूर्णपणे खचली होती. ‘मी पूर्णपणे खचली आहे, माझ्या जोडीदाराने मला एकटं सोडलं’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.