टीव्ही 9 मराठीच्या ‘आपला बायोस्कोप अवॉर्ड्स 2023’मध्ये या कलाकारांनी मारली बाजी

टीव्ही 9 मराठी वाहिनीकडून आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ‘वाळवी’, ‘बापल्योक’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. चित्रपट आणि टीव्ही विभागातील कोणत्या कलाकारांनी बाजी मारली ते पाहुयात..

टीव्ही 9 मराठीच्या 'आपला बायोस्कोप अवॉर्ड्स 2023'मध्ये या कलाकारांनी मारली बाजी
TV9 Marathi Aapla Bioscope awards 2023Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 9:45 PM

मुंबई : 9 डिसेंबर 2023 | टीव्ही 9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप 2023’ या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या सहारा हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती, समूह यांच्या कामाचा गौरव यावेळी करण्यात आला. मालिका आणि सिनेजगतातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव ‘आपला बायोस्कोप 2023’ या पुरस्काराच्या माध्यमातून केला गेला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात कोणकोणत्या कलाकारांनी बाजी मारली, ते पाहुयात..

टीव्ही 9 मराठी आपला बायोस्कोप अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची यादी (चित्रपट विभाग)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- दिग्पाल लांजेकर, सुभेदार
  • सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता- रितेश देशमुख, वेड
  • सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री- शिवानी सुर्वे, वाळवी
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- सुभेदार, प्रद्योत पेंढारकर
  • सर्वोत्कृष्ट गाणं- वेड तुझा, वेड
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- चिन्मय मांडलेकर, सुभेदार
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुकन्या मोने, बाईपण बारी देवा
  • सर्वोत्कृष्ट खलनायक- सयाजी शिंदे, घर बंदूक बिर्याणी
  • सर्वोत्कृष्ट जोडी- रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख, वेड
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (ज्युरी)- आत्मपँफलेट
  • सामाजिक प्रभाव असलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट (ज्युरी)- बालभारती
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- जितेंद्र जोशी
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निखिल महाजन
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सायली संजीव

टीव्ही 9 मराठी आपला बायोस्कोप अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची यादी (टीव्ही विभाग)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- सचिन गोखले, ठरलं तर मग (स्टार प्रवाह)
  • सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता- अक्षय मुडावदकर, जय जय स्वामी समर्थ (कलर्स मराठी)
  • सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री- जुई गडकरी, ठरलं तर मग (स्टार प्रवाह)
  • सर्वोत्कृष्ट मालिका- ठरलं तर मग (स्टार प्रवाह)
  • सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन- महाराष्ट्राची हास्यजत्रा (सोनी मराठी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- प्रशांत चौडप्पा, फुलाला सुगंध मातीचा (स्टार प्रवाह)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- ज्योती चांदेकर, ठरलं तर मग (स्टार प्रवाह)
  • सर्वोत्कृष्ट खलनायक- कविता लाड मेढेकर, तुला शिकवीन चांगलाच धडा (झी मराठी)
  • आतापर्यंतचा सर्वोत्तम खलनायक- सुनील तावडे, पिंकीचा विजय असो (स्टार प्रवाह)
  • सर्वोत्कृष्ट जोडी- हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे, तुला शिकवीन चांगलाच धडा (झी मराठी)
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.