Birthday Spl | …म्हणून मुलांना आपले चित्रपट दाखवायला ‘ट्विंकल खन्ना’ लाजते, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल!
ट्विंकल खन्ना आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ट्विंकल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते.
मुंबई : ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ट्विंकल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. एकदा, तिने एका मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या मुलांना माझे रोमँटिक चित्रपट बघू देत नाही. जेव्हा माझा मुलगा माझाच रोमँटिक चित्रपट पाहतो तेव्हा मला लाज वाटते. ट्विंकल म्हणाली की, ‘आरव खूप खोडकर आहे. माझ्या जुन्या रोमँटिक सीनचा व्हिडिओ तो वारंवार पाहतो आणि माझी खिल्ली उडवतो. (Twinkle Khanna is celebrating her 47th birthday today)
‘ ट्विंकलने 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ट्विंक आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 17 चित्रपट केले आहेत. 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाला निरोप दिला. अभिनयाला निरोप दिल्यानंतर ट्विंकलने लिखानाच्या जगात प्रवेश केला. तिने बरीच पुस्तके लिहिली आहेत.
यासोबतच ट्विंकल गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांची निर्मिती करत आहे. ट्विंकल ने ‘Mrs. Funnybones’, ‘The Legend Of Lakshmi Prasad’ आणि ‘Pyjamas Are Forgiving’ असे पुस्तके लिहिली आहेत. ‘Pyjamas Are Forgiving’ 2018 हे महिला लेखिकेचे सर्वात विकले जाणारे भारतातील पुस्तक ठरले आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेल्या होता. त्यावेळी अभिनेत्री आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारचा एका व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर होता. यामध्ये अक्षय हा खांबावर लटकलेला होता. आणि तो कुठलातरी फिटनेस चॅलेंज पूर्ण करताना दिसत होता. निश्चित वेळेपर्यंत या खांबाच्या सहाय्याने हवेत लटकणाऱ्याला 100 पाउंडचं बक्षीस मिळणार होतं. 100 पाउंडसाठी लटकलेल्या अक्षयचा हा व्हिडीओ शेअर करत ट्विंकलने त्याची खिल्ली उडवली होती.
ट्विंकलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर होता. व्हिडीओ शेअर करताना ”जस्ट हँगिंग इन देअर! फोर्ब्स लीस्टमध्ये नाव येऊनही याला समाधान नाही, त्याला लगेच 100 पाउंडही जिंकायचे आहेत”, असं कॅप्शन दिलं होत.
संबंधित बातम्या :
रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया
Highest Fees | ‘अक्षय कुमार’ ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!
(Twinkle Khanna is celebrating her 47th birthday today)