जोडीदार निवडताना विचार करायला सांगणारी ट्विंकल खन्ना म्हणते, ‘कुत्तों से शादी’ करने से…’

Twinkle Khanna on Marriage : अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचा तरुणींना मोठा सल्ला, अभिनेत्री म्हणते, 'कुत्तों से शादी' करने से...', अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची बाजू घेत ट्विंकल हिचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ट्विंकल खन्ना हिच्या वक्तव्याची चर्चा

जोडीदार निवडताना विचार करायला सांगणारी ट्विंकल खन्ना म्हणते, 'कुत्तों से शादी' करने से...'
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 12:59 PM

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : लग्न करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. सध्याच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे कोणतंही नातं सुरु करण्याआधी विचार करायला हवा… अशी आजच्या पिढीची मानसिकता आहे. दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने डेटिंगवर केलेल्या वक्तव्यावर अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र ट्विंकल खन्ना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान दिग्दर्शिक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दीपिका पादुकोण पती आणि अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत पोहोचली होती.

शोमध्ये दीपिका हिने डेटिंगवर वक्तव्य केलं होतं. दीपिका म्हणाली, ‘रणवीर सिंग याच्यासोबत मी सुरुवातीला सीरियस रिलेशनशिपमध्ये नव्हती… मी कॅज्युअल डेटिंग करत होती…’ दीपिका पादुकोण हिच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. आता दीपिका पादुकोण हिची बाजू घेत ट्विंकल हिचं मोठं वक्तव्य केलं आहे.

एका कॉलममध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘आपण अशा देशात राहतो जेथे कुत्रा आणि झाडासोबत लग्न मानलं जातं, पण तुम्ही एका जेंडरच्या व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही. मला आठवत आहे… माझ्या बिल्डिंगमधील एका काकींनी मला सांगितलं होत, की एका मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न कुत्र्यासोबत केलं होतं..’

हे सुद्धा वाचा

पुढे ट्विंकल खन्ना म्हणाली, ‘सुरुवातीला तर मला त्यांच्या एकाही गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यानंतर मी एक बातमी वाचली. एका मुलीचं लग्न शेरु नावाच्या एका मुलासोबत लावण्यात आलं होतं. कारण मुलीला मंगळ आहे आणि असे केल्याने मुलीचे सर्व दोष कुत्र्यावर जाईल.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, अभिनेत्रीने एक उत्तम उदाहरण देखील दिलं. ‘आपण एखादा सोफा घ्यायला जातो तेव्हा दुकानात जातो. अनेक सोफे पाहाता. त्यानंतर कोणता सोफा घ्यायचं ठरवतो… पण जेव्हा एका व्यक्तीला निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र पर्याय न पाहाता फक्त एका व्यक्तीची निवड करावी अशी अपेक्षा असते.. मला असं वाटतं दीपिका हिने घेतलेला निर्णय योग्य आहे. असं केल्यामुळे अनेक महिला कुत्रे आणि बेडकांसोबत लग्न बंधनात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करु शकतात. ‘ सध्या सर्वत्र ट्विंकल खन्ना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.