Urfi Javed: ‘पोलीस तक्रारीनंतर सुधारली’; उर्फीच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
विस्कटलेले केस, सुजलेले डोळे, चेहऱ्यावर डाग.. कॅमेरा पाहून उर्फी जावेदने का लपवला चेहरा?
मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात नुकतीच पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबईतील रस्त्यावर न्युडिटी पसरवल्याचा आरोप करत त्यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली. यानंतर उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस तक्रारीनंतर पहिल्यांदाच ती पापाराझींसमोर दिसली. मात्र यावेळी तिचा अंदाज नेहमीपेक्षा खूपच वेगळा होता. कॅमेरापासून चेहरा लपवत ती एका रेस्टॉरंटमध्ये गेली. यावेळी तिच्या कपड्यांवरूनही नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.
उर्फी जेव्हा पापाराझींसमोर येते, तेव्हा कितीही तोकडे आणि बोल्ड कपडे असले तरी ती आत्मविश्वासाने फोटोसाठी पोझ देताना पहायला मिळते. मात्र या व्हिडीओमुळे उर्फीने चक्क पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट आणि त्याखाली शॉर्ट्स घातले होते. एका कॅफेच्या बाहेर तिला पापाराझींनी पाहिलं, मात्र यावेळी ती कॅमेऱ्याला टाळताना दिसली. चेहरा लपवत ती त्या कॅफेमध्ये गेली.
उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर हा बदल दिसल्याचं अनेकांनी म्हटलंय. ‘पहिल्यांदाच नीट कपडे परिधान केले आहेत म्हणून तिला लाज वाटत असावी’, अशी उपरोधिक कमेंट एकाने केली. तर ‘पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा परिणाम’ असं दुसऱ्याने लिहिलं. ‘सर्वसामान्य कपडे परिधान केल्यानंतर कॅमेरापासून लपणारी ही पहिलीच अभिनेत्री असेल’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट चर्चेत आली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे. ‘मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणं खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातलं बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचं केलं नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत’, असं उर्फीने लिहिलंय.