“Urfi Javed मुलगी नाही तर किन्नर”, अभिनेत्याचा धक्कादायक दावा, पुरावेही दाखवण्यास तयार
उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मुंबई : अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेचा विषय ठरते. अनेकजण तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करतात. तर काही जण तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्लीही उडवतात. मात्र कशालाच न जुमानता उर्फी नेहमीच चित्रविचित्र कपड्यांमध्ये पहायला मिळते. आता उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे केवळ सर्वसामान्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींच्याही निशाण्यावर आली आहे. त्यापैकीच एक नवा फैजान अन्सारीचंही आहे. फैजानला अनेकदा उर्फीच्या विरोधात बोलताना पाहिलं गेलंय. मात्र यावेळी तो असं काही बोललाय, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
फैजानने उर्फी जावेदला किन्नर म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर ही बाब सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावाही त्याने केला आहे. या पुराव्यांना तो लवकरच कोर्टात सादर करणार आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैजान म्हणाला, “माझ्याकडे पुरावे आहेत, ज्यांच्या आधारे मी देशासमोर मोठा खुलासा करणार आहे. उर्फी जावेद ही मुलगी नाही तर किन्नर आहे. माझा तिच्यासोबत आधीपासूनच वाद सुरू होता, मात्र आता तो हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. मी आता थेट कोर्टात तिच्याविरोधातील पुरावे सादर करणार आहे. किन्नर समाजाच्या प्रमुखांनाही मी कोर्टात बोलावणार आहे.”
View this post on Instagram
फैजानने पुढे म्हटलं, “माझ्या टीमने उर्फीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती प्रत्येकाशी उद्धटपणे वागते. ती म्हणते की तिला मुस्लिम समाजाशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे आता तिच्याशी बोलून काही उपयोग नाही. तिला थेट धडा शिकवावा लागेल. ती एक मुस्लिम असून आमचं नाव अशा पद्धतीने खराब करतेय. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर लोकांसमोर सत्य आणेन.”
उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली होती.
“काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे”, असा सवाल उर्फीने केला होता.