AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed | ‘चेटकिणीचे केस’; अतरंगी ड्रेसमुळे उर्फी पुन्हा ट्रोल; केसांपासून बनवला अजब टॉप

“उर्फीला जे करायचं आहे तेच ती करते. यालाच फॅशन म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वत:बद्दल कॉन्फिडंट असता आणि स्वत:च्या मनाला पटेल तसंच करता. मला तिचा आत्मविश्वास खूपच आवडतो”, अशा शब्दांत करीनाने तिचं कौतुक केलं होतं.

Urfi Javed | 'चेटकिणीचे केस'; अतरंगी ड्रेसमुळे उर्फी पुन्हा ट्रोल; केसांपासून बनवला अजब टॉप
Urfi Javed Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 10:03 AM
Share

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणखी किती अनोखे आणि विचित्र डिझाइन्सचे ड्रेस बनवू शकते, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडत असतानाच ती दररोज नव्या आऊटफिटने सर्वांना चकीत करते. बुधवारी उर्फीने चक्क केसांपासून बनवलेला टॉप परिधान केला होता. फिकट निळ्या रंगाच्या टॉपला तिने लांब हेअर एक्स्टेशन्स लावले होते. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत. काहींनी तिला या विचित्र ड्रेसबद्दल ट्रोल केलंय, तर काहींनी तिची बाजू घेतली आहे.

‘काहीही बोला पण ती इतर सेलिब्रिटींपेक्षा स्वभावाने खूप चांगली आहे’, अशा शब्दांत एकाने उर्फीचं कौतुक केलं. तर ‘उर्फी कोणत्याही गोष्टीला फॅशन बनवू शकते. हे जणू चेटकिणीचे केसच वाटत आहेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. उर्फीने चुकीच्या जागी हेअर एक्स्टेन्शन्स लावल्याचंही काहींनी म्हटलंय. सोशल मीडियावर उर्फीचा मोठा फॅनफॉलोईंग आहे. शिवाय पापाराझी अकाऊंटवर तिचे दररोज नवीन व्हिडीओ पोस्ट केले जातात.

उर्फीने तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे फक्त नेटकऱ्यांचंच नाही तर सेलिब्रिटींचंही लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री करीना कपूरने उर्फीचं कौतुक केलं होतं. उर्फीच्या बोल्ड फॅशनबद्दल तुला काय वाटतं असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “फॅशन म्हणजे व्यक्त होणं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. माझ्या मते उर्फीमध्ये हाच आत्मविश्वास आहे आणि त्यात आत्मविश्वासाने ती कपडे घालते. मला ती खूपच कूल वाटते.”

पहा व्हिडीओ

“उर्फीला जे करायचं आहे तेच ती करते. यालाच फॅशन म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वत:बद्दल कॉन्फिडंट असता आणि स्वत:च्या मनाला पटेल तसंच करता. मला तिचा आत्मविश्वास खूपच आवडतो”, अशा शब्दांत करीनाने तिचं कौतुक केलं होतं. तर अभिनेत्री नेहा धुपियाने उर्फीकडे चक्क तिच्या एक ड्रेसची मागणी केली होती. उर्फीने घालतेला बाहुल्यांचा ड्रेस तिला खूपच आवडला होता. त्यावर कमेंट करत ‘मला हा ड्रेस पाहिजे’ अशी मागणी तिने केली होती. त्यामुळे उर्फीवर टीका करणारे जरी अनेक असेल तरी तिच्या बाजूने काही नेटकरी आणि सेलिब्रिटी बोलत आहेत.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.