‘खड्ड्यात जाऊ दे रणबीर कपूरला, त्याची लायकी काय आहे?’; उर्फी जावेद असं का म्हणाली?
उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हे असं नाव आहे ज्याकडे आता बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा दुर्लक्ष करू शकत नाहीत. उर्फीची फॅशन मोठमोठ्या फॅशन डिझायनर्सनाही थक्क करणारी आहे. उर्फी तिच्या कामापेक्षा अधिक कपड्यांमुळेच सतत चर्चेत असते. अतरंगी स्टाइलमुळे तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूरविषयी उर्फी असं काही म्हणाली, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अभिनेता रणबीर कपूरने उर्फीचा फॅशन अजिबात आवडत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र त्याची बहीण आणि अभिनेत्री करीना कपूरने उर्फीचं कौतुक केलं होतं. उर्फीच्या बोल्ड फॅशनबद्दल तुला काय वाटतं असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “फॅशन म्हणजे व्यक्त होणं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. माझ्या मते उर्फीमध्ये हाच आत्मविश्वास आहे आणि त्यात आत्मविश्वासाने ती कपडे घालते. मला ती खूपच कूल वाटते.”
“उर्फीला जे करायचं आहे तेच ती करते. यालाच फॅशन म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वत:बद्दल कॉन्फिडंट असता आणि स्वत:च्या मनाला पटेल तसंच करता. मला तिचा आत्मविश्वास खूपच आवडतो”, अशा शब्दांत करीनाने तिचं कौतुक केलं होतं. करीनाच्या या कौतुकावर तुझी काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न उर्फीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “करीना कपूरने माझं कौतुक केल्यानंतर मी काहीतरी साध्य केलं, असं मला वाटलं. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. खड्ड्यात जाऊ दे रणबीर कपूर. करीनाने माझं कौतुक केलंय, त्याची काय लायकी आहे?”
View this post on Instagram
उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली होती.
“काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे”, असा सवाल उर्फीने केला होता.