चित्र वाघ यांच्या आक्षेपानंतर उर्फी जावेद हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ
विचित्र कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडलेल्या उर्फी जावेदवर होतोय कोणत्या गोष्टीचा परिणाम? सोशल मीडियावर चाहत्यांचा आकडा मोठ्या संख्येने वाढला...
मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ मधून प्रसिद्धीझोतात आलेली मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत असते. विचित्र कपडे घालून कायम सोशल मीडियावक चर्चेत असणारी उर्फी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?;’ अशी टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर उर्फीने देखील त्यांनी सडेतोड इत्तर दिलं. आता चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातिला वाद शमण्याचं नाव घेत नाही.
चित्रा वाघ यांच्यानंतर उर्फी जावेद हिच्याविरोधात महिला संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विचित्र कपड्यांवर एकीकडे वाद सुरु आहे, तर दुसरीकडे उर्फीच्या चाहत्यांची संख्या मात्र मोठ्या संख्येने वाढली आहे. उर्फीच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
उर्फीच्या सोशल मीडिया फॉलोअर्सबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या वर्षी मे महिन्यात इन्स्टाग्रामवर उर्फीच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास ३ मिलियन होती. आता चित्रा वाघ यांच्या आक्षेपानंतर उर्फी जावेद हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आता इन्स्टाग्रामवर उर्फीचे ४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
इन्स्टाग्राम सोबतच उर्फीच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ट्विटरवर उर्फीला फॉलो करणाऱ्यांची संख्या 123.6K इतकी होती आता ही संख्या 123.7K पर्यंत पोहोचली आहे. तर उर्फी ट्विटर फक्त ९ जणांना फॉलो करते.
सध्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.