AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela : उर्वशीचा सोन्याचा आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीकडून ई-मेल; ‘iPhone परत करेन पण..’

उर्वशी रौतेलाने भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचदरम्यान तिचा अत्यंत महागडा फोन गमावला होता. उर्वशीचा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन हरवला होता. तो फोन शोधून देणाऱ्यांसाठी तिने बक्षीस जाहीर केलं होतं. आता एका व्यक्तीला तिचा हा फोन सापडला असून त्याने उर्वशीला ई-मेल केला आहे.

Urvashi Rautela : उर्वशीचा सोन्याचा आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीकडून ई-मेल; 'iPhone परत करेन पण..'
Urvashi RautelaImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2023 | 8:20 AM
Share

मुंबई : 19 ऑक्टोबर 2023 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचदरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिचा अत्यंत महागडा फोन हरवला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. इतकंच नव्हे तर तो फोन शोधून देणाऱ्याला तिने बक्षीससुद्धा जाहीर केलं होतं. उर्वशीचा हरवलेला हा फोन 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन होता. हा फोन खास ऑर्डर अंतर्गत डिझाइन करण्यात आला होता. आता एका व्यक्तीला उर्वशीचा आयफोन सापडला असून त्याने उर्वशीला ई-मेल केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र संबंधित व्यक्तीने तिला फोन परत देण्याच्या बदल्यात एक खास गोष्ट मागितली आहे. उर्वशीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

ज्या व्यक्तीला उर्वशीचा आयफोन सापडला, त्याने ई-मेल करून तिला माहिती दिली. मात्र फोन परत देण्याच्या बदल्यात त्याने खास मागणी केली आहे. ‘माझ्याकडे तुझा फोन आहे. जर तुला परत हवा असेल तर माझ्या भावाला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी मदत कर’, असं संबंधित व्यक्तीने ई-मेलमध्ये लिहिलं आहे. उर्वशीने या मेलचा स्क्रीनशॉट इन्स्टा-स्टोरीमध्ये पोस्ट करत त्यावर ‘थंब्स अप’चा इमोजी पोस्ट केला आहे.

फोन हरवल्यानंतर उर्वशीने ट्विटरवर लिहिलं होतं, ‘अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा फोन हरवल आहे. जर कोणाला हा फोन सापडला तर कृपया माझी मदत करा. मला तातडीने संपर्क करा.’ या ट्विटमध्ये तिने अहमदाबाद स्टेडियम आणि नरेंद्र मोदी स्टेडियम यांना टॅग केलं होतं. यासोबतच तिने पोलीस तक्रारीचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टवर अहमदाबाद पोलिसांनी कमेंट करत विचारलं होतं, ‘मोबाइल फोनची अधिक माहिती द्या.’ हा फोन शोधून देणाऱ्यांसाठी तिने बक्षीससुद्धा जाहीर केलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशीचा हा 24 कॅरेट सोन्याचा iPhone 14 Pro Max होता. या फोनला खास ऑर्डर अंतर्गत डिझाइन करण्यात आला होता. उर्वशीच्या या फोनची किंमत तब्बल 7 लाख 55 हजार 430 रुपये असल्याचं कळतंय.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.