Ind Vs Pak मॅच पाहणं उर्वशीला पडलं महागात; गमावली ‘ही’ अत्यंत महागडी वस्तू

भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी अहमदाबादला गेलेल्या अभिनेत्री उर्वशी रोतैलाला मोठा फटका बसला आहे. मॅच पाहताना स्टेडियममध्ये तिने तिची लाखो रुपयांची एक वस्तू गमावली आहे. याबद्दल तिने ट्विट करत चाहत्यांना विनंती केली आहे.

Ind Vs Pak मॅच पाहणं उर्वशीला पडलं महागात; गमावली 'ही' अत्यंत महागडी वस्तू
Urvashi RautelaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 9:51 AM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना चांगलाच गाजला होता. टीम इंडियाचा विजय साजरा करण्यासाठी असंख्य क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर केले. मात्र अभिनेत्री उर्वशी रौतेलाला हा सामना पाहणं चांगलंच महागात पडलं आहे. उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही मॅच पार पडली होती. मॅच पाहताना उर्वशीने तिचा आयफोन गमावला आहे. तिचा हा आयफोन साधासुधा नाही तर 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा होता. फोन गमावल्याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

उर्वशीने X वर (ट्विटर) याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. ‘अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा फोन हरवल आहे. जर कोणाला हा फोन सापडला तर कृपया माझी मदत करा. मला तातडीने संपर्क करा’, अशी विनंती तिने युजर्सना केली आहे. या ट्विटमध्ये तिने अहमदाबाद स्टेडियम आणि नरेंद्र मोदी स्टेडियम यांना टॅग केलं आहे. यासोबतच तिने पोलीस तक्रारीचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टवर अहमदाबाद पोलिसांनी कमेंट करत विचारलं, ‘मोबाइल फोनची अधिक माहिती द्या.’

हे सुद्धा वाचा

उर्वशीची पोस्ट-

या ट्विटरनंतर उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही स्वत:चा स्टेडियमवरील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘अजूनही माझ्या फोनची वाट पाहतेय’, असं तिने या व्हिडीओवर लिहिलं आहे. उर्वशीच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘छोटी बच्ची हो क्या?’ हा टायगर श्रॉफचा प्रसिद्ध डायलॉग एकाने कमेंटमध्ये लिहिला. तर ‘ही मॅच तुला खूपच महागात पडली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आयफोन सोन्याचाही मिळतो का’, असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर काहींनी अहमदाबाद पोलिसांवर विश्वास व्यक्त केला आहे. ‘अहमदाबाद पोलीस तुझा फोन 100 टक्के शोधून देतील’, असं युजरने म्हटलंय.

उर्वशीच्या या पोस्टच्या कमेंटमध्ये काहींनी क्रिकेटर ऋषभ पंतलाही टॅग केलं आहे. ‘ऋषभ, तिचा फोन तिला परत दे’, असं काहींनी मस्करीत म्हटलंय. उर्वशी आणि ऋषभ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशीही चर्चा होती. मात्र ऋषभने या चर्चा फेटाळल्या होत्या.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.