Rishabh Pant: उर्वशीच्या आईने घेतली ऋषभ पंतची भेट? फोटो पोस्ट करत लिहिलं ‘काळजी करू नको बेटा’

ऋषभ पंतबद्दल उर्वशीच्या आईने लिहिली 'ही' खास पोस्ट? चिडलेले नेटकरी म्हणाले 'काय ड्रामा आहे?'

Rishabh Pant: उर्वशीच्या आईने घेतली ऋषभ पंतची भेट? फोटो पोस्ट करत लिहिलं 'काळजी करू नको बेटा'
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत उर्वशीच्या आईने व्यक्त केली चिंताImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 2:29 PM

मुंबई: क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघातानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि तिची आई मीरा रौतेला यांचे सोशल मीडियावरील पोस्ट सतत चर्चेत येत आहेत. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उर्वशी ऋषभच्या नावाचा वापर करतेय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला फटकारलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा उर्वशीच्या आईने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे त्यासुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. ऋषभला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उर्वशीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर आता तिची आई मीरा रौतेला यांनीसुद्धा असाच काहीसा फोटो पोस्ट केला आहे.

मीरा यांनी इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिला फोटो कोकिलाबेन रुग्णालयाचा आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या मंदिराबाहेर उभ्या असल्याचं पहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी उर्वशीला टॅग करत लिहिलं ‘सगळं काही ठीक होईल बेटा, काळजी करू नकोस’. या पोस्टमुळे नेटकरी पेचात पडले आहेत.

ज्या रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू आहेत, त्याचा फोटो पोस्ट करत काळजी करू नको असं लिहिणं हे नेटकऱ्यांना पेचात पाडणारं आहे. या पोस्टवरून नेटकऱ्यांनी मीरा यांना ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे मीरा रौतेला या ट्रोल्सच्या प्रश्नांना ताबडतोब उत्तरं देत होत्या.

हे सुद्धा वाचा

मीरा रौतेला यांची पहिली पोस्ट-

एका युजरने लिहिलं, ‘व्हॉट्स ॲप किंवा कॉल करून पण हे सांगता आलं असतं.’ त्यावर उत्तर देत मीरा यांनी लिहिलं, ‘बुद्धू आहेस, मग तुला कसं समजलं असतं.’ दुसऱ्याने लिहिलं ‘सकाळपर्यंत स्पोर्ट्स आणि सिनेमा बीटवाले या पोस्टवर आणखी मिर्ची लावतील’. त्यावर हसण्याचा इमोजी पोस्ट करत मीरा लिहितात ‘उद्या टीआरपी’.

मीरा रौतेला यांची दुसरी पोस्ट-

आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘आणखी एक वादग्रस्त पोस्ट. हा काय ड्रामा आहे?’ त्यावर उत्तर देताना मीरा यांनी लिहिलं, ‘माझा मेडिकल रिपोर्ट, उर्वशी रौतेला विशाखापट्टणममध्ये आहे’.

मीरा यांनी ट्रोलर्सना उत्तरं दिली असली तरी यातून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हेच नेटकऱ्यांना समजलं नाही. मीरा रौतेला या स्वत:साठी कोकिलाबेन रुग्णालयात गेल्या असतील असाही अंदाज व्यक्त होत आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.