तिकिट मिळालंय पण..; लोकसभा निवडणूक लढवणार उर्वशी रौतेला?

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकिट मिळाल्याचा खुलासा केला आहे. मात्र ही निवडणूक ती लढवणार की नाही याबद्दल तिने काही स्पष्ट केलं नाही. उर्वशी तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते.

तिकिट मिळालंय पण..; लोकसभा निवडणूक लढवणार उर्वशी रौतेला?
उर्वशी रौतेलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 11:51 AM

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने चाहत्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. उर्वशीने सांगितलंय की तिला निवडणुकीसाठी तिकिट मिळालं आहे. मात्र हे तिकिट कोणत्या मतदारसंघातून मिळालंय याविषयी तिने काहीच स्पष्ट केलं नाही. त्याचसोबत ती निवडणूक लढवणार की नाही, हेसुद्धा तिने अद्याप सांगितलं आहे. सोशल मीडियावर उर्वशीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ती स्वत: निवडणुकीच्या तिकिटाविषयी बोलताना दिसतेय. “मला तिकिट मिळाली आहे, पण निवडणूक लढायची की नाही हे मला ठरवायचं आहे. मी निवडणूक लढवावी की लढवू नये? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा”, असं ती या व्हिडीओत म्हणतेय.

उर्वशीला या व्हिडीओमध्ये राजकारणाविषयी प्रश्न विचारला गेला होता. तुला राजकारणात रस आहे का, असा सवाल केला असताना उर्वशीने तिला थेट निवडणुकीसाठी तिकिट मिळाल्याचा खुलासा केला. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला अभिनयावरच लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. काहींनी त्यावरून उर्वशीची खिल्लीसुद्धा उडवली आहे.

हे सुद्धा वाचा

उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचं तिचं अफेअर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली तरी त्या पोस्टला ऋषभ पंतशी जोडलं जातं. उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.

उर्वशी तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिचा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन हरवला होता. सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.