Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उतरन’ फेम अभिनेत्याच्या भावाचं गंभीर आजाराने निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

'उतरन' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्याच्या भावाचं गंभीर आजाराने निधन; भावाचा फोटो शेअर करत अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला...

'उतरन' फेम अभिनेत्याच्या भावाचं गंभीर आजाराने निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 5:21 PM

मुंबई : काही वर्षांपूर्वी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका ‘उतरन’ तुफान चर्चेत होती. मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. पण ‘उतरन’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणाऱ्या नंदीश संधू आणि त्यांच्या कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याचा भाऊ ओंकार सिंग संधू याचं निधन झालं आहे. ओंकार सिंह संधू याच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे. ओंकार सिंग संधू यांचं कर्करोगामुळे निधन झालं आहे. २८ एप्रिल रोजी अभिनेत्याच्या भावाने अखेरचा श्वास घेतला. नंदीश याच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते… सध्या ओंकार सिंह संधू यांच्या निधनामुळे खळबळ माजली आहे. अनेकांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

नंदीश याने भाऊ ओंकार सिंह संधू याच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. शिवाय अभिनेत्याने भावाचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘असाच स्मरणात राहा… नेहमी हसत राहा, जगात आनंद पसरवत राहा, आमच्या आयुष्यात कायम राहा, तू खरा सेनानी आहेस. जगाच्या पलीकडे कधीतरी भेटूया, तू मला लढायला शिकवलंस. असं अभिनेत्याने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याने स्वतःचं दुःख चाहत्यांसोबत शेअर केलं. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्या पोस्टवर चाहते देखील कमेंट करत भावना व्यक्त करत आहेत. चाहते देखील अभिनेत्याच्या भावाला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

कॉमेडियन भारतीने नंदिशच्या भावाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तिने लिहिलं- ‘RIP’. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, नंदिश, तुला या दु:खाशी लढण्याचे बळ मिळो. खंबीर राहा.’

अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने लिहिलं- हे खूप मोठं नुकसान आहे, हे जाणून खूप दुःख झालं, या कठीण काळात तुमच्या कुटुंबाला बळ मिळो. शरद मल्होत्रा ​​याने दुःख व्यक्त करत लिहिलं, ओम शांती. सध्या सर्वत्र अभिनेता नंदीश आणि त्याच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.