प्रसिद्ध टीव्ही अभिनेता स्टेज 4 कॅन्सरने ग्रस्त; उपचारासाठी नाहीत पैसे, सेलिब्रिटींनी चाहत्यांकडे मागितली मदत

या पोस्टवर चाहत्यांनी आणि टीव्ही इंडस्ट्रीतल्या सहकलाकारांनी कमेंट करत काळजी व्यक्त केली होती. यादरम्यान आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी वैभवच्या उपचारासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता स्टेज 4 कॅन्सरने ग्रस्त; उपचारासाठी नाहीत पैसे, सेलिब्रिटींनी चाहत्यांकडे मागितली मदत
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता स्टेज 4 कॅन्सरने ग्रस्तImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 5:47 PM

मुंबई: ‘निशा और उसके कझिन्स’ या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता वैभव राघवे स्टेज-4 कॅन्सरने ग्रस्त आहे. गेल्या वर्षी खुद्द वैभवने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. वैभवने रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये कॅन्सरविषयी बोलताना तो अत्यंत भावूक झाला होता. या पोस्टवर चाहत्यांनी आणि टीव्ही इंडस्ट्रीतल्या सहकलाकारांनी कमेंट करत काळजी व्यक्त केली होती. यादरम्यान आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी वैभवच्या उपचारासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.

वैभव राघवेचा मित्र आणि अभिनेता मोहित मलिक आणि अदिती मलिक यांनी उपचारासाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘नमस्कार मित्रांनो.. आम्ही आमचा मित्र वैभव कुमार सिंह राघवे (विभू राघवे) याच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. एका दुर्मिळ प्रकारच्या कोलन कॅन्सरने तो ग्रस्त आहे. गेल्या वर्षी आम्हाला जेव्हा याविषयी समजलं, तेव्हा आम्ही पूर्णपणे खचलो होतो. आमच्यासाठी हे खूप धक्कादायक होतं. मात्र आपण एकत्र येऊन त्याची मदत केली तर त्याच्यासाठी हा प्रवास सोपा करू शकतो’, असं मोहितने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

अदिती आणि मोहन यांनी पुढे लिहिलं, ‘गेल्या वर्षी उपचारादरम्यान त्याने चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र त्याला अधिक उपचाराची गरज आहे. आतापर्यंत जमवलेला फंड सगळा संपला आहे. मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या एका इम्युनोथेरेपीची किंमत साडेचार लाख रुपये आहे. त्याच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. आम्ही आमच्या बाजूने बरेच प्रयत्न करत आहोत. मात्र तुमचीही मदत मिळाली तर तो बरा होऊ शकतो. तुम्हाला जेवढं शक्य होईल, तेवढी मदत करा.’

अदिती आणि मोहितशिवाय मोहसिन खान, करणवीर बोहरा आणि सिंपल कौल यांनीसुद्धा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.

वैभव राघवेनं ‘रिधम’ आणि ‘सुवरिन गुग्गल- टॉपर ऑफ द इअर’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘निशा और उसके कझिन्स’ या मालिकेतून त्याला घराघरात प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्याने अनेरी वजनी आणि मोहसिन खान यांच्यासोबत काम केलं होतं.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.