शेजारी राहणाऱ्या पुरुषावर प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; गमवावा लागला स्वतःचा जीव

परदेशातील डॉक्टरसोबत झालेला साखरपुडा मोडत अभिनेत्रीने शेजारच्या पुरुषावर केलं प्रेम; पण त्यानंतर जे झालं ते अत्यंत भयानक होतं... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

शेजारी राहणाऱ्या पुरुषावर प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; गमवावा लागला स्वतःचा जीव
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 9:53 AM

मुंबई, 17 जुलै 2023 : मयानगरीत येवून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा अनेकांना असते. अनेक अभिनेते, अभिनेत्री मुंबईत येतात. काहीच्या स्वप्नांना पंख मिळतात तर, काहींना मात्र अपयश मिळत. एवढंच नाही तर आतापर्यंत अनेक कालाकारांनी झगमगत्या विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अखेरचा श्वस घेतला. असंच काही टीव्ही विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं होतं. छोट्या पडद्यावरच्या मोठ्या अभिनेत्रीचा मान मिळवणाऱ्या अभिनेत्रीचा अंत फार भयानक होता. परदेशातील डॉक्टरासोबत झालेला साखरपुडा तोडणं आणि शेजारी राहणाऱ्या पुरुषावर प्रेम करणं अभिनेत्रीला महागात पडलं. अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

आता सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वैशाली ठक्कर आहे. वैशाली हिने टीव्ही विश्वातील अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यात मात्र वैशाली हिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. वैशाली हिचा साखरपुडा २६ एप्रिल २०२१ मध्ये केनिया येथील डॉक्टर अभिनंदन सिंग यांच्यासोबत झालं होतं.

फक्त साखरपुडाच नाही तर लग्नाची तारीख देखील ठरली होती. जून २१ मध्ये अभिनेत्रीचं परदेशातील डॉक्टरासोबत मोठ्या थाटात लग्न होणार होतं. पण त्याआधीच दोघांचं नातं तुटलं. साखरपुड्याच्या एक महिन्यानंतर हे नातं तुटलं. या गोष्टीची माहिती खुद्द वैशाली हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. एवढंच नाही तर अभिनेत्रीने साखरपुड्या आधी होणाऱ्या रोका सोहळ्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण अभिनेत्रीने नंतर व्हिडीओ डिलिट केला.

रिपोर्टनुसार, वैशाली शेजारी राहणाऱ्या एका पुरुषाच्या प्रेमात पडली होती. पण शेजारी राहणाऱ्या पुरुषावर प्रेम करणं अभिनेत्रीला प्रचंड महागात पडलं. वैशाली हिला स्वतःचा जीव गमवावा लागला. १५ ऑक्टोबर २०२१ मध्ये अभिनेत्रीने तिच्या राहत्या घरी स्वतःला संपवलं. यासाठी वैशाली हिने एक्स -बॉयफ्रेंड राहुल नवलानी याच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता.

राहुल, वैशालीबद्दल नको त्या अफवा पसरवत होता. असं अभिनेत्री शेवटच्या पत्रात लिहिलं होतं. वैशाली हिने इतर कोणासोबत लग्न करावं अशी त्याची इच्छा नव्हती. त्याने अभिनेत्रीचे व्हिडिओ आणि फोटो वैशालीचे होणारे पती डॉ. अभिनंदन सिंग यांना पाठवले होते. ज्यामुळे डॉक्टरसोबत होणारं अभिनेत्रीचं लग्न तुटलं. होणाऱ्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री टोकाचं पाऊल उचलंलं आणि स्वतःचा जीव संपवला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.