चाहत्यांसोबत सेल्फी घेत असताना अचानक बेशुद्ध झाला हा अभिनेता, रुग्णालयात केलं दाखल

चाहत्यांसोबत सेल्फी घेणं अभिनेत्याला पडलं महागात, बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात केलं दाखल... कशी आहे आता अभिनेत्याची प्रकृती? चाहत्यांकडून चिंता व्यक्त...

चाहत्यांसोबत सेल्फी घेत असताना अचानक बेशुद्ध झाला हा अभिनेता, रुग्णालयात केलं दाखल
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 2:16 PM

मुंबई : एखादा मोठा स्टार दिसला की, त्याला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि विशेष म्हणजे सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांती उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. सेलिब्रीटी देखील चाहत्यांना पाहिल्यानंतर आनंदी होतात आणि चाहत्यांना महत्त्व देखील देतात. पण चाहत्यांच्या गर्दीत अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे सेलिब्रिटींना त्रास सहन करावा लागतो आता देखील असंच काही झालं आहे. चाहत्यांसोबत सेल्फी घेत असताना प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता अचानक बेशुद्ध झाला. प्रकृती खालावल्यामुळे तात्काळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अभिनेत्यासोबत घडलेल्या घटनेची तुफान चर्चा रंगत आहे. शिवाय चाहते अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत चिंता देखील व्यक्त करत आहेत.

चाहत्यांसोबत सेल्फी घेत असताना अचानक बेशुद्ध अभिनेत्याचं नाव मामुकोया (Mamukkoya) आलं आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मामुकोया यांच्याबाबत एक वाईट बातमी येत आहे. पुंगगोड जानकी सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पोहोचल्यावर मामुकोया यांची तब्येत बिघडली आणि ते जागीच कोसळले. सध्या मामुकोया यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

रिपोर्टनुसार, जेव्हा ज्येष्ठ अभिनेते मामुकोया सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पोहोचले, तेव्हा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. चाहत्यांची मोठी गर्दी जमल्यामुळे मामुकोया यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि ते जागीच पडले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना, तात्काळ कोझिकोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

मामुकोया यांना हृदयविकाराचा झटका आला अशा अफवा पसरल्या होत्या. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मामुकोया यांच्यावर सध्या कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ७६ वर्षीय मामुकोया यांनी ‘फ्लेमेन इम पॅराडीज’ या सिनेमात देखील काम केलं आहे.

मामुकोया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मल्याळम सिनेमात पाऊल ठेवण्यापूर्वी मामुकोया कॉमेडी स्टार होते. शिवाय त्यांचं थिएटर क्षेत्रात मोठं योगदान आहे. अशाचप्रकारे मामुकोया यांचा प्रवास सुरु झाला. मामुकोया यांनी तब्बल 450 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आणि दोन राज्य पुरस्कारही जिंकले.

मामुकोया यांना ‘पेरुमाझक्कलम’ आणि ‘इन्नाथे चिंता विषयम’ यांसाठी दोन केरळ राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर मामुकोया यांचे चाहते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या सर्वत्र मामुकोया यांची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.