आईला ट्रोल केल्यामुळे अंकिताचा नवरा भडकला, कॅमेऱ्यासमोरच संतापत म्हणाला, माझ्या…

Ankita Lokhande and Vicky Jain : अंकिता लोखंडे ही कायमच चर्चेत असते. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झालीये. मात्र, अनेक गंभीर आरोप करणे सध्या सुरू आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद हा बघायला मिळतोय. आता विकी जैन हा चांगलाच भडकल्याचे बघायला मिळतंय.

आईला ट्रोल केल्यामुळे अंकिताचा नवरा भडकला, कॅमेऱ्यासमोरच संतापत म्हणाला, माझ्या...
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 12:02 PM

मुंबई : बिग बॉस 17 पेक्षाही सध्या अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे तूफान चर्चेत आहेत. बिग बॉस 17 च्या घरात नुकताच अंकिता लोखंडे हिची सासू रंजना जैन आणि आई दाखल झाली. यावेळी अंकिता लोखंडे हिच्या सासूने थेट म्हटले की, ज्यावेळी तू विकीला लाथ मारली त्यावेळी पप्पांनी तुझ्या आईला फोन केला आणि विचारले की, तुम्ही देखील पतीला अशाचप्रकारे लाथ मारत असत का? यानंतर अंकिता लोखंडे हिचा संताप बघायला मिळाला. हेच नाही तर तिने थेट म्हटले की, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मला बोला…माझ्या आईला नाही…आताच माझे वडिल वारले आहेत आणि हे सर्वकाही…

हेच नाही तर बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही रंजना जैन या अंकिता लोखंडे हिच्यावर टीका करताना दिसत आहेत. यानंतर सोशल मीडियावर सतत रंजना जैन यांना खडेबोल हे सुनावले जात आहेत. नुकताच आता यावर विकी जैन हा बोलताना दिसला. हेच नाही तर विकी जैन हा थेट अंकिता लोखंडे हिला मोठा सवाल करताना दिसला.

अंकिता लोखंडे हिची सासू अर्थात विकी जैन याची आई सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. करण जोहर हा या विकेंडच्या वारमध्ये होस्ट करताना दिसेल. रिपोर्टनुसार यावेळी यावर बोलताना करण जोहर दिसणार आहे. विकी जैन हा यानंतर भडकला आणि त्याने थेट अंकिता लोखंडे हिलाच मोठे प्रश्न केले. विकी म्हणाला, माझे कुटुंब नेहमीच तुला सपोर्ट करते.

या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबियांची इमेज खराब होत आहे. तुला कधीतरी माझ्या कुटुंबियांनी तुझ्या राहण्यावर काही भाष्य केले का? यावर अंकिता म्हणाली कधीच नाही. पुढे विकी जैन म्हणाला की, माझ्या कुटुंबियांनी तुझ्या भूतकाळाबद्दल कधी काही बोलले आहे किंवा मी…यानंतर अंकिता म्हणाली की, अजिबात नाही मला सर्वांनी सपोर्ट केला असून तू तर खूप प्रेम दिले.

माझ्या कुटुंबियांनी कधीच तुझ्या कामामध्ये देखील दखल दिली नसल्याचे सांगताना विकी जैन हा दिसला. येणारा एपिसोडमध्ये धमाका होणार हे नक्कीच आहे. आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यामध्ये कुठेतरी तणाव आल्याचे बघायला मिळतंय. सोशल मीडियावर आणि काही कलाकार हे देखीव विकी जैन याच्या आईवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.