तुझे सुबह तक मैं करूं प्यार.. दुसरीसोबत विकी जैनची फ्लर्टिंग पाहून भडकली अंकिता
‘बिग बॉस 17’च्या पहिल्या एपिसोडपासूनच अंकिता आणि विकी या दोघांमध्ये सतत खटके उडताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही जोडी जरी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असली तरी त्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पहायला मिळत आहे.
मुंबई : 6 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात सतत भांडणं होताना दिसतात. विकी अनेकदा असं काही करतो, ज्यामुळे अंकिता त्याच्यावर भडकते. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्येही पुन्हा हेच घडलं. विकी, आयेशा खान आणि ईशा मालवीय हे तिघे गार्डन एरियामध्ये आराम करत असतात. त्यावेळी आयेशा अंगावर चादर ओढून झोपलेली असते. या एपिसोडमध्ये तिने रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर अचानक विकी गाणं गाताना दिसतो, “तुझे सुबह तक मैं करूं प्यार..” विकीच्या गाण्याचे बोल ऐकून आयेशासुद्धा त्याच्यासोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाही. लगेच चादर खाली ओढून ती म्हणते, आज मी स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे. हे ऐकताच विकी म्हणतो, “तुला काय वाटतं की मला गाणं असंच आठवलं का?”
विकी फ्लर्ट करत असल्याचं पाहून आयेशा लगेच त्याची पत्नी अंकिता लोखंडेला आवाज देते. काय झालं असा प्रश्न अंकिताने विचारताच विकी घाबरून जातो आणि म्हणतो “काही नाही.” तोपर्यंत अंकिताच्या रागाचा पार चढलेला असतो आणि ती म्हणते, “मला सर्व ऐकू येतंय की तू काय घाणेरड्या गोष्टी बोलतोय ते.” हे ऐकल्यानंतर ईशा विकी आणि आयेशाचा बचाव करते. “यांची फक्त मस्करी सुरू आहे”, असं ती म्हणते. मात्र त्यावर अंकिताचा विश्वास बसत नाही. “मी माझ्या पतीला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. त्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे मला नीट माहीत आहे”, असं ती सुनावते. अंकिताला भडकल्याचं पाहून आयेशासुद्धा विकीचा बचाव करते. आम्ही फक्त गंमत करत होतो, असं ती अंकिताला सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र अंकिताचा राग शांत होत नाही. ती विकीवर पुन्हा भडकते.
This is not acceptable I’m Glad She Confronts Him. As a Married Man He Should know his boundaries. Phir girls aise personality ki taraf attract ho jati h or home breaker kehlati h , #VickyBhaiya #VickyJain #AnkitaLokhande#BiggBoss17 #BB17 #BiggBos pic.twitter.com/ZkuuAsFbX4
— Neeru (@NSid_1212) January 4, 2024
बिग बॉसच्या घरात विकी जैनला अनेकदा इतर स्पर्धकांशी जवळीक साधताना पाहिलं गेलंय. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विकी हा मन्नारा चोप्रासोबत दिल रुममध्ये जेवायला जातो. जेव्हा अंकिता याचा जाब विचारते, तेव्हा तो तिच्यावर भडकतो. अंकितालाही विकीबाबत अनेकदा पझेसिव्ह झाल्याचं पहायला मिळालंय. यावरूनच विकी आणि अंकिता यांच्यात सतत भांडणं झाली आहेत.
मन्नारासोबत जेवणाच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणानंतर विकी अंकिताला मुनव्वर फारुकीशी बोलणं बंद करायला सांगतो. त्यावर अंकिता म्हणते की मुनव्वर तिच्या भावासारखा आहे. मात्र त्या व्यक्तीसोबत अंकिताने बोलणं टाळलं पाहिजे ज्यामुळे तिच्या पार्टनरला समस्या असेल, असं विकी म्हणतो. या भांडणानंतर अंकिता विकीकडे जाऊन माफी मागते.