Vicky-Katrina Wedding : विकी आणि कॅटरिना बनले पती-पत्नी, घरातच केलं लग्नाचं रजिस्टर मॅरेज!
दोघांनीही आतापर्यंत लग्नाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. एकीकडे विकी आणि कतरिनाच्या राजस्थानमधील लग्नाच्या ग्रँड इव्हेंटकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशावेळी या दोघांनी रविवारी रात्रीच कायदेशीर रित्या रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण त्यांच्या लग्नाबाबत (Marriage Ceremony) मोठा संस्पेन्स सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हे दोघे एकमेकांच्या घरी जाताना, तसंच त्यांचे कुटुंबीय लग्नाची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरी या दोघांनीही आतापर्यंत लग्नाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. एकीकडे विकी आणि कतरिनाच्या राजस्थानमधील लग्नाच्या ग्रँड इव्हेंटकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशावेळी या दोघांनी रविवारी रात्रीच कायदेशीर रित्या रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याची माहिती मिळत आहे.
रविवारी संध्याकाळी कतरिना कैफ विकी कौशलच्या घरी जाताना दिसून आली होती. त्यांचे काही फोटोही माध्यमांमध्ये आले होते. कतरिना पांढऱ्या रंगाची साडी घालून घरातून निघाली आणि विकीच्या घरी जाताना दिसून आली. ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांनी घरीच एका अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि विशेष विवाह अधिनियम, 1954 नुसार रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. दरम्यान, अद्यापही विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. आता ती एक औपचारिक प्रक्रिया असल्याचं बोललं जात आहे.
सवाई माधोपुरमध्ये मोठी बैठक, कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा!
विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. हा दिवस खास करण्यासाठी दोघेही जोरदार तयारी करत आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या लग्नापूर्वी सवाई माधोपूरच्या डीएमने बैठक बोलावली आहे.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत सवाई माधोपूरच्या डीएमने 3 डिसेंबरला बैठक आयोजित केली आहे. ज्यामध्ये गर्दी नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्थेसह सर्व परिस्थितीचे मूल्यांकन केले जाईल. ही बैठक शुक्रवारी पार पडणार आहे. कतरिना आणि विकी 9 डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत, पण त्या आधी विकी आणि कतरिना कोर्ट मॅरेज करणार आहेत. हा विवाह विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत होणार आहे.
सलमान खानचा बॉडीगार्ड देणार सुरक्षा
मीडिया वृत्तानुसार, सलमान खानला लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले नसले तरी, त्याचा वैयक्तिक अंगरक्षक शेरा, टायगर सिक्युरिटीची सुरक्षा टीम सिक्स सेन्स फोर्टवर या हाय प्रोफाईल लग्नाच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. तत्पूर्वी, लग्नस्थळी सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सवाई माधोपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही व्हायरल झाले आहे.
इतर बातम्या :