‘असं मला आवडणार…’, ‘टायगर 3’ सिनेमातील कतरिना कैफ हिच्या टॉवेल सीनवर विकी कौशल याची पहिली प्रतिक्रिया

Katrina Kaif Towel Fight Scene : 'टायगर 3' सिनेमातील कतरिना कैफ हिच्या टॉवेल सीनवर विकी कौशल अखेर व्यक्त झालाच; मोठ्या पड्यावर पत्नीला टॉवेलमध्ये सीन करताना पाहून विकी म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याच्या वक्तव्याची चर्चा.

'असं मला आवडणार...', 'टायगर 3' सिनेमातील कतरिना कैफ हिच्या टॉवेल सीनवर विकी कौशल याची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 8:15 AM

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात कतरिना हिने अनेक अ‍ॅक्शन दिले आहेत. सिनेमात कतरिना हिने दिलेले अ‍ॅक्शन सीन चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत. पण सिनेमातील एका सीनमुळे कतरिना हिची तुफान चर्चा रंगली. ‘टायगर 3’ सिनेमात अभिनेत्रीने टॉवेलमध्ये अ‍ॅक्शन सीन शुट केला आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर टॉवेलमधील अभिनेत्रीचा अ‍ॅक्शन सीन तुफान चर्चेत आहे. कतरिना हिच्या टॉवेल सीनवर अभिनेता विकी कौशल याने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत विकी याने कतरिनाच्या टॉवेल सीनवर मौन सोडलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘सिनेमाच्या स्क्रिनींसाठी मी गेलो होतो. तेव्हा आम्ही सिनेमा पाहात होतो. कतरिनाचा टॉवेलवाला सीन आला तेव्हा मी तिला म्हणालो, आजनंतर कधीच तुझ्यासोबत वाद घालणार नाही. तू टॉवेलमध्ये माझी मारहाण करशील असं मला बिलकूल आवडणार नाही…’

पुढे पत्नीचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, ‘कतरिना हिने सीनला योग्य न्याय दिला आहे. मी तिला सांगितलं तू बॉलिवूडची सर्वात उत्तम अ‍ॅक्शन अभिनेत्री आहेस. मला कतरिना हिच्या मेहनतीवर गर्व आहे. तिला पाहाणं कायम माझ्यासाठी प्रेरणादायक असतं…’ विकी आणि कतरिना कायम एकमेकांचं कौतुक करताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर देखील विकी आणि कतरिना एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, विकी – कतरिना कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. शिवाय कुटुंबासोबत देखील विकी – कतरिना वेळ व्यतीत करताना दिसतात. चाहत्यांमध्ये देखील कैफ आणि कौशल कुटुंबाची चर्चा रंगलेली असते.

विकी कौशल याचा सिनेमा

विकी कौशल याने देखील आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता चाहते विकी याच्या ‘सॅम बहादूर’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. सिनेमात अभिनेत्याने फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका बजावली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.