‘कोणती नशा केलीये…’, विकी कौशल याने गुपचूप पत्नी कतरिनाचा बनवला असा व्हिडीओ

Vicky Kaushal : विकी कौशल याने पत्नी कतरिना कैफ हिचा गुपचूप असा व्हिडीओ सोशल मीडियावर केला पोस्ट; नेटकरी म्हणाले, 'कोणती नशा केलीये...' सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कतरिना हिच्या व्हिडीओची चर्चा...

'कोणती नशा केलीये...', विकी कौशल याने गुपचूप पत्नी कतरिनाचा बनवला असा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 9:03 AM

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते कायम दोघांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. विकी – कतरिना बॉलिवूडवर राज्य करतात, पण चाहत्यांच्या मनात देखील दोघांनी घर केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शाही थाटात दोघांनी लग्न केलं. विकी – कतरिना यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता अभिनेत्रीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ खुद्द विकी याने गुपचूप शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कतरिना हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी विकी याने सोशल मीडियावर कतरिना हिचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये विकी – कतरिना विमात प्रवास करताना दिसते. तेव्हा अभिनेत्याने स्वतःच्या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा ऑन केला आणि कतरिना हिच्या नकळत एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये कतरिना बॉक्सिंग करताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर विकी याने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पत्नी कतरिना हिचा व्हिडीओ पोस्ट करत विकी म्हणाला, ‘विमानात आणि आयुष्यात मनोरंजन… लव्ह यू ब्यूटीफुल… कीप इट कमिंग…’, अभिनेत्याच्या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच नाही सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे..

एक नेटकरी कमेंट करत म्हणाली, ‘फक्त कतरिना असं करु शकते..’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणती नशा केली आहे…’ सांगायचं झालं तर, चाहत्यांना देखील विकी – कतरिना यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, विकी – कतरिना कुटुंबासोबत देखील वेळ व्यतीत करतात. विकी – कतरिना यांचे कुटुंबासोबत देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खासगी आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अभिनेत्री कतरिना कैफ देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.