AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

vicky kaushal महागड्या दुकातून नाहीतर रस्त्यावरून पत्नी कतरिनासाठी खरेदी करतोय खास गोष्ट; पाहा व्हिडीओ

पती हवा तर असा... , रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातून विकी पत्नी कतरिनासाठी खरेदी करतोय खास गोष्ट; व्हिडीओ पहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

vicky kaushal महागड्या दुकातून नाहीतर रस्त्यावरून पत्नी कतरिनासाठी खरेदी करतोय खास गोष्ट; पाहा व्हिडीओ
| Updated on: Jun 03, 2023 | 10:26 AM
Share

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ९ डिसेंबर २०२१ रोजी शाही थाटात विकी – कतरिना यांनी लग्न केलं. आता अनेक ठिकाणी विकी – कतरिना एकत्र हजेरी लावतात. शिवाय सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत प्रेम व्यक्त करतना दिसतात. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विकी रस्त्यावरून पत्नी कतरिनासाठी काहीतरी खरेदी करताना दिसत आहे.

विकी रस्त्यावरून पत्नी कतरिनासाठी दागिने खरेदी करताना दिसत आहे. विकी पत्नी करिनासाठी कोणत्या महागड्या दुकानातून नाही तर, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातून दागिने खरेदी करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र विकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

व्हिडीओमध्ये विकी अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत दिसत आहे. रस्त्यावरून खरेदी करताना याआधी देखील साराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि विकी ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघे चक्क रस्त्यावरून दागिने खरेदी करत आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना विकी – सारा यांचा अंदाज आवडला आहे, तर काहींनी मात्र दोघांना ट्रोल केलं आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘विकीला दागिन्यांमध्ये काहीही रस नाही, त्याला माहित आहे पत्नी हे दागिने घालणार नाही… सिनेमासाठी काय काय करावं लागतं…’, दुसरा युजर कमेंट करत म्हणाला, ‘विकीने कतरिनासाठी काय खरेदी केलं..’ सध्या सर्वत्र सारा – विकी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

सारा – विकी स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा

सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता सारा – विकी ही जोडी प्रेक्षकांना अवडत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय सिनेमाला माउथ पब्लिसिटीचा देखील फायदा झाला असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या दिवशी सिनेमा ३ कोटी रुपयांपर्यंत कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ५.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाला सुट्ट्यांचा फायदा होवू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.