‘छावा’ सिनेमासमोर बॉक्स ऑफिस झुकलं, सगल 38 दिवस सिनेमाचा बोलबाला, कमाईचा आडक भुवया उंचवणारा
Chhaava Box Office Collection Day 38: 'छावा' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे... सलग 38 दिवस सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई... 38 व्या दिवसाची कमाई जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र 'छावा' सिनेमाची चर्चा...

Chhaava Box Office Collection Day 38: अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाच्या कमाई पुढे बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झालं आहे. सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी सिनेमा अनेक रेकॉर्ड ब्रेक करत आहे, ‘छावा’ सिनेमा गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसचा राजा झाला आहे. सगल 38 दिवस ‘छावा’ सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. तर सिनेमाने रविवार पर्यंत किती कोटींची कमाई केली जाणून घेऊ…
‘छावा’ सिनेमाची 38 व्या दिवसाची कमाई किती?
‘छावा’ सिनेमाच्या कमाईने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. सिनेमा इतिहासावर आधारलेल्या असल्यामुळे प्रेक्षकांनी देखील सिनेमा पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाच्या वेग मंदावला असला तरी सिनेमाने अनेक हीट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. तेलुगू भाषेत देखील सिनेमा दमदार कमाई करताना दिसत आहे.
‘छावा’ सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात 219.25 कोटींची कमाई केली आहे.
दुसऱ्या आठवड्यात ‘छावा’ सिनेमाने 180.25 कोटी रुपयांचा कमाई केली आहे.
तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने 84.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
चौथ्या आठवड्यात सिनेमाने 55.95 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.
पाचव्या आठवड्यात ‘छावा’ सिनेमाने 33.35 कोटी रुपयांपर्यंत मजल माजली.
तर 36 व्या दिवशी सिनेमाने 2.1 कोटी कमावले आहेत. आता ‘छावा’ सिनेमाच्या 38 व्या दिवसाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, 38 व्या दिवशी म्हणजे 6 व्या आठवड्याच्या रविवारी सिनेमाने 4.34 कोटींची कमाई केली आहे.
म्हणजे सिनेमाने आतापर्यंत 583.35 कोटींची कमाई केली आहे. ‘छावा’ने सहाव्या वीकेंडलाही चमत्कार केला आणि पुन्हा सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. 38व्या दिवशीही या सिनेमाने इतर सर्व सिनेमांना मागे टाकत सर्वाधिक कमाईचा विक्रम केला. 38 व्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारे हे सिनेमे आहेत.
‘छावा’ सिनेमाच्या 38 व्या दिवसाची कमाई 4.34 कोटी आहे.
‘स्त्री 2’ सिनेमाच्या 38 व्या दिवसाची कमाई 3.23 कोटी इतकी होती.
‘पुष्पा 2’ सिनेमाने 38 व्या दिवसांत कमाई 1.65 कोटींची कमाई केली.
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाच्या 38 व्या दिवसाची कमाई 1.51 कोटी इतकी होती.
‘सिकंदर’ सिनेमामुळे लागेल ‘छावा’ सिनेमाच्या कमाईला ब्रेक
सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाचं राज्या पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये कोणताच सिनेमा ‘छावा’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकलेला नाही. पण आता अभिनेता सलमान खान स्टारर ‘सिकंदर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘छावा’ सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागेल का? पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘सिकंदर’ सिनेमात देखील अभिनेत्री रश्मिका मंदाना, भाईजानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.