Video | सलमान खान याच्यासमोर हात जोडण्याची वेळ शाहरुख खानवर, वाचा नेमके काय घडले?
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरामगन केले आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सर्वांना सलमान खान याची देखील एक झलक बघायला मिळाली होती.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दणदणीत असे पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण चित्रपट सुपहिट ठरलाय. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हाच चित्रपट (Movie) ठरलाय. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या यशानंतर लगेचच डंकी आणि जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. विशेष म्हणजे फार काही खास पठाण (Pathaan) चित्रपटाचे प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसला नाही.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटावर सतत टीका केली जात होती. काहींनी तर थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही थेट करून टाकली होती. मात्र, या विरोधाचा फायदाच पठाण चित्रपटाला झाला.
शाहरुख खान याच्या चित्रपटामध्ये थेट दबंग खानची देखील झलक चाहत्यांना बघायला मिळाली. सलमान खान याच्या केमिओमुळे डबल धमाका चाहत्यांना मिळाला. विशेष म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान यांची जोडी बऱ्याच वर्षांनंतर स्क्रीन शेअर करताना दिसली. ज्यावेळी पठाण हा अडचणीमध्ये होता, त्यावेळी सलमान त्याच्या मदतीला धावून आल्याचे दाखवण्यात आले.
शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यामध्ये खास मैत्री आहे. नुकताच सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा सर्वांसमोर हात जोडताना दिसत आहे. शाहरुख खान म्हणाला की, ज्यावेळी मी मुंबईमध्ये दाखल झालो, त्यावेळी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी माझी खूप जास्त मदत केली.
मी फक्त धक्केच नाही खाल्ले तर मी सलमान खान याच्या घरी नेहमीच जेवण देखील करायचो. मी घरचे जेवण केल्यानेच इथंपर्यंत पोहचू शकलो. यासाठी मी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांसमोर हात जोडतो. म्हणजेच करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी शाहरुख खान याची मोठी मदत केली आहे. सलमान आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकसोबत काम केले आहे.