Vidya Balan आहे एका मुलीची आई, लेकीला ठेवलं सर्वांपासून लपवून? नक्की काय आहे सत्य

Vidya Balan | विद्या बालन आहे एका मुलीची आई? अभिनेत्रीचं खासगी आयुष्य रहस्यमय... फोटोमध्ये अभिनेत्री कोणावर प्रेम करत आहे व्यक्त, नक्की काय आहे सत्य? चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा.

Vidya Balan आहे एका मुलीची आई, लेकीला ठेवलं सर्वांपासून लपवून? नक्की काय आहे सत्य
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 7:29 PM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना अभिनेत्रीने सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी कायम गुपित ठेवत असते. त्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सध्या विद्या बालन हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री एका मुलीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. ज्यामुळे फोटोमध्ये विद्या हिच्यासोबत दिसणारी मुलगी कोण? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबत विद्या बालन हिला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. विद्या मुलीचे प्रचंड लाड करताना दिसली. म्हणून फोटोमध्ये दिसणारी मुलगी विद्या बालन हिचीच आहे… असं अनेकांना वाटलं. रंगणाऱ्या चर्चांवर आता खुद्द अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे.

मुलगी झाल्याच्या चर्चांवर विद्या बालन म्हणाली…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विद्या बालन हिने ‘सीक्रेट मुली’वर मौन सोडलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘फोटोमध्ये दिसणारी मुलगी माझ्या बहिणीची असून तिचं नाव इरा असं आहे. ती माझी मुलगी नाही, पण माझ्या बहिणीची मुलं माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझं संपूर्ण जगच माझ्या बहिणीची मुलं आहेत…’ सध्या सर्वत्र विद्या बालन हिची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

विद्या बालन हिचे सिनेमे

विद्या बालन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘नीयत’ (2023) सिनेमाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करु शकला नाही. आता अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमासाठी तयारी करत आहे.

विद्या लवकरच ‘लव्हर्स’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या विद्या ‘लव्हर्स’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि प्रतिक गांधी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

विद्या गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होती. पण आता विद्या हिने बॉलिवूडमध्ये पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.