‘तुझं आयुष्य उद्ध्वस्त करुन टाकेल…’, अनेक वर्षांनंतर Vidya Balan हिला का आठवली ‘ती’ घटना?

Vidya Balan : 'तुझं आयुष्य उद्ध्वस्त करुन टाकेल...', 'ती' घटना आठवल्यानंतर आजही विद्या बालन यांचा उडतो थरकाप... विद्या बालन कायम तिच्या खासगी आणि प्रेफोशनल आयुष्यामुळे असते चर्चेत... अनेक वर्षांनंतर धक्कादायक घटनेवर सोडलं मौन...

'तुझं आयुष्य उद्ध्वस्त करुन टाकेल...',  अनेक वर्षांनंतर Vidya Balan हिला का आठवली 'ती' घटना?
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 3:07 PM

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री विद्या बालन हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये कायम सक्रिय असते. विद्या हिने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली, पण ‘द डर्टी पिक्चर’मुळे अभिनेत्री प्रसिद्ध झोतात आली. सिनेमातील गाणी देखील प्रचंड हीट झालीत. आजही ‘ऊ ला ला…’ हे गाणं अनेक कार्यक्रमांमध्ये वाजतं. पण जेव्हा विद्या बालन हिने सिनेमा करण्यासाठी होकार दिला तेव्हा दिला अनेक संकटांचा सामाना करावा लागला. पण कोणताही विचार न करता विद्या हिने सिनेमात मुख्य भूमिका साकारली आणि बॉक्स ऑफिस हाऊसफुल झाले…

‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर आधारित आहे. सिल्क स्मिता हिच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले होते. सिनेमा प्रदर्शित होवून अनेक वर्षे झाली आहे. तरी देखील सिनेमाचं शुटिंग दरम्यानच्या अनेक घटना विद्या बालन आजही विसरु शकलेली नाही.

विद्या बालन म्हणाली, ‘जेव्हा सिल्क स्मिता यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. पहिल्यांदा मिलन लूथरिया माझ्याकडे आले. तेव्हा मला ते चुकिच्या दारात आले आहे का?… कारण मला विश्वासच होत नव्हता… ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळत आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे विद्या बालन म्हणाल्या, ‘सिनेमात भूमिका साकारण्यासाठी माझी तयारी होती. पण माझ्या भोवती असलेले लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. तेव्हा अशी काही लोकं होती, जे मला म्हणाले होते, तुझं आयुष्य, करियर उद्ध्वस्त होईल…’ सध्या सर्वत्र विद्या बालन यांची चर्चा रंगत आहे. ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता.

अनेकांना ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमात सिल्क स्मिता भूमिका साकारण्यात विद्या बालन हिला नकार दिला होता. पण त्या एक सिनेमामुळे विद्या बालन हिचं संपूर्ण नशीब बदललं. सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं… आज सिनेमाला अनेक वर्ष उलटली असली तरी सिनेमाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

विद्या बालन आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.