…आता विद्युत जामवाल शोधणार ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’; आणखी चार कलाकार दिसणार आहेत खास ‘अ‍ॅक्शन’ मध्ये

'इंडियाज अल्टीमेट वॉरियर' या कार्यक्रमासह, विद्युत जामवाल OTT रिअ‍ॅलिटी सीरिज आणि टीव्ही जगतातील होस्ट आणि डोजो मास्टर म्हणूनही पदार्पण करणार आहे. या रिअ‍ॅलटी शोचा प्रीमियर डिस्कवरी प्लस वर 4 मार्च आणि डिस्कवरी चॅनेलवर 14 मार्च रोजी येणार आहे.

...आता विद्युत जामवाल शोधणार 'इंडियाज अल्टीमेट वॉरियर'; आणखी चार कलाकार दिसणार आहेत खास 'अ‍ॅक्शन' मध्ये
India’s Ultimate WorrierImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 7:58 PM

मुंबईः बॉलीवूड अ‍ॅक्टर विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) हा अ‍ॅक्शन (Action) स्टंटससाठी खास करुन ओळखला जातो. त्याच्या अ‍ॅक्शन सिन्ससाठी अनेक दिग्गज कलाकारांनी त्याचे भरभरून कौतूक केले आहे. आणि आता लवकरच एका नव्या अवतारात तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स टीव्हीवरील (Colors Tv) खतरों के खिलाडी नंतर आता डिस्कवरी इंडिया (Discovery India) आपला नवीन शो ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ हा रिअ‍ॅलटी शो लाँच करत आहेत. या रिअ‍ॅलटी शोमध्ये बॉलीवूड अ‍ॅक्शन स्टार विद्युत जामवाल दिसणार आहे. ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ या कार्यक्रमासह, विद्युत जामवाल OTT रिअ‍ॅलिटी सीरिज आणि टीव्ही जगतातील होस्ट आणि डोजो मास्टर म्हणूनही पदार्पण करणार आहे. या रिअ‍ॅलटी शोचा प्रीमियर डिस्कवरी प्लस वर 4 मार्च आणि डिस्कवरी चॅनेलवर 14 मार्च रोजी येणार आहे.

विद्युतबरोबर या शोमध्ये आणखी चार कलाकार आहेत, जे अ‍ॅक्शन आणि स्टंटसमध्ये अगदी वाखबगार आहेत. आणि हे आता सगळे अंतिम योद्धा शोधण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहेत. या सगळ्यांजवळ आता लक्ष्य, त्यांचे नियंत्रण आणि मनाचा दृढनिश्चय, संतुलन आणि त्यांच्यात असलेली शिस्त यासारख्या गोष्टींचे त्यांच्यामध्ये मिश्रण भरले आहे.

विद्युत एकमेव भारतीय

‘कमांडो’ आणि डेब्यू ‘खुदा हाफिज’द्वारे आपल्या अभिनयाने पदार्पण करणारा अभिनेता विद्युत जामवाल हा कलारीपयट्टू या सर्वात जुन्या मार्शल आर्ट प्रकारात तो तरबेज आहे, आणि त्यात त्याला माहिर असल्याचंही सांगितलं जात आहे. त्याने  या जगातील सर्वोच्च मार्शल आर्टिस्ट म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे, आणि या प्रकारात तो एकमेव भारतीय आहे.

तो नक्कीच वॉरियर बनू शकतो

‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ शो यशस्वी करण्यासाठी त्याने आता जबरदस्त पुढाकार घेतला आहे. विद्युत या कार्यक्रमात फाईट कँप म्हणजेच लढाऊपणाची प्रॅक्टीस देणार आहे. या रिअॅलटी शोमधील सगळ्या कार्यक्रमात आयोजन करण्यात त्याने पुढाकार घेतल्याने, त्याच्यावर कार्यक्रमाची जबाबदारीही वाढली आहे. या कार्यक्रमाविषयी तो सांगतो की, या कार्यक्रमात माझे खरे काम आहे ते अल्टीमेट वॉरियर ला शोधून काढणे. कोणत्याही क्षेत्रातील आणि कुणीही यामध्ये वॉरियर बनू शकतो, कारण त्याला दिलेल्या वेळेत आपला मेंदू, शरीर आणि आपले मनाद्वारे आयुष्यातील कठीण परिस्थितीतही त्याने सगळ्यात तगडे प्रदर्शन केले तर तो नक्कीच वॉरियर बनू शकतो.

रोमांचक आव्हानांचा खजिना

चॅनेलने शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टर्समध्ये विद्युतला अ‍ॅक्शन मोडवर असणाऱ्या विद्युतला वेगवेगळ्या तऱ्हेने सादर केले आहे. त्याच्या बरोबर असणाऱ्या इतर चार जणही या पोस्टर्समध्ये आहेत. हा मार्गदर्शक मार्शल आर्ट्स, युद्ध आणि जगण्यासाठी लागणारी विविध कौशल्ये यामध्ये विशेष तज्ञ आहे, आणि त्यामध्ये रोमांचक आव्हानेही आहेत.

संबंधित बातम्या

‘पावनखिंड’चा झंझावाती दुसरा आठवडा; महाराष्ट्रात 50% आसनक्षमता असतानाही जोरदार कमाई

रब ने बना दी जोडी! लंडनमध्ये हातात हात घालून दिसले ‘इंडियन आयडॉल १२’ फेम पवनदीप-अरुणिता

Jhund: नागराज मंजुळेंची मराठीमोळी ‘झुंड’; फँड्री-सैराटमधल्या ‘या’ कलाकारांना पाहता येणार

'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.