AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विजय वर्मा याने खास फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली?

बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील विजय वर्मा याचं नाव एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडण्यात येत आहे...

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विजय वर्मा याने खास फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली?
| Updated on: Feb 15, 2023 | 2:54 PM
Share

Vijay Varma Confirm Relationship : झगमगत्या विश्वात कायम चर्चाचे विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे एकमेकांसोबत असलेले खास कनेक्शन. बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील अशा दोन सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत ज्यावर चाहत्यांचा विश्वास देखील बसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamannaah bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) यांच्यात खास नातं असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विजय वर्मा याने खास फोटो शेअर केला आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विजय वर्मा याने खास फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये एका बाजुला विजयचा पाय दिसत आहे, दुसऱ्या बाजुला अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा पाय असल्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, दोघांच्या पायामध्ये रंगाचा हार्ट इमोजी देखील दिसत आहे. विजयने खास फोटो पोस्ट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Valentine Day with)

फोटोमध्ये दिसणार पाय तमन्ना हिचा आहे का? अशी चर्चा रंगत आहे. तर एक फोटो असाही समोर येत आहे, ज्यामध्ये तमन्नाच्या पायात असलेले बूट विजयने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये असलेले बूट सारखे दिसत आहे. त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवाय अनेक ठिकाणी विजय आणि तमन्ना यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

पण आतापर्यंत विजय किंवा तमन्ना यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही. तमन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील विजयने अभिनेत्रीसोबत वेळ व्यतीत केला. २१ डिसेंबर रोजी अभिनेत्रीने मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. पण तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. ( affairs relationships)

एवढंच नाहीतर, तमन्ना आणि विजय यांनी नव्या वर्षाचं स्वागत देखील एकत्र केलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. शिवाय एकदा दोघांना एकत्र मुंबाई याठिकाणी स्पॉट करण्यात आलं.

तमन्ना आणि विजय यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर विजय लवकरच बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘बोल चुडिया’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (BOLLYWOOD)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.