प्रेम कधीच लपत नाही… Vijay – Tamannaah यांना ‘या’ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर चर्चांना उधाण

'त्या'ठिकाणी विजय वर्मा - तमन्ना भाटिया यांना करण्यात आलं एकत्र स्पॉट; बॉलिवूडचं आणखी एक प्रेम प्रकरण समोर... सर्वत्र विजय वर्मा - तमन्ना भाटिया यांच्या नात्याची चर्चा...

प्रेम कधीच लपत नाही... Vijay - Tamannaah यांना 'या'ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 4:57 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात कायम चर्चाचे विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे एकमेकांसोबत असलेले खास कनेक्शन. बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील अशा दोन सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत ज्यावर चाहत्यांचा विश्वास देखील बसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्यात खास नातं असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. शिवाय दोघांनी एकत्र नव वर्षाचं स्वागत केल्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या आहे. रिपोर्टनुसार दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं कळत आहे. दोघांनी बॉलिवूडचं नवीन कपल अशी देखील ओळख मिळाली आहे.

नुकताच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघे कारमधून एकत्र जात होते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांना डिनर डेट दरम्यान एकत्र स्पॉट करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. पण अद्याप तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केलेला नाही.

काही दिवसांपूर्वी तमन्ना भाटिया हिला विजय वर्मा याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘एका सिनेमात एकत्र काम केल्यामुळे अफवा पसरत आहेत… यावर कोणत्याही स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही…’ त्यामुळे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्यामध्ये नक्की नातं काय आहे… हे अद्याप कळू शकलं नाही. केवळ तमन्नाच नाही, तर विजयनेही एका पोस्टद्वारे डेटिंगच्या अफवांचे खंडन केलं.

दरम्यान, तमन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील विजयने अभिनेत्रीसोबत वेळ व्यतीत केला. २१ डिसेंबर रोजी अभिनेत्रीने मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. पण तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

तमन्ना आणि विजय यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर विजय लवकरच बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘बोल चुडिया’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.