खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. बॉलिवूड अभिनेत्यासोबत ‘बाहुबली’मधल्या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

यावेळी कार्यक्रमात हे दोघं केवळ एकमेकांसमोर आलेच नाहीत तर त्यांनी पापाराझींसाठी एकत्र पोझसुद्धा दिले. तमन्ना आणि विजय ही सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी बनली आहे.

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.. बॉलिवूड अभिनेत्यासोबत 'बाहुबली'मधल्या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
Tamannaah BhatiaImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 12:00 PM

मुंबई: ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गोव्यातील नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्नाला एका बॉलिवूड अभिनेत्याशी लिपलॉक करताना पाहिलं गेलं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा या जोडीला मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र पाहिलं गेलं आहे. हा अभिनेता आहे आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता विजय वर्मा. एका पुरस्कार सोहळ्यात विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाला पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं.

यावेळी कार्यक्रमात हे दोघं केवळ एकमेकांसमोर आलेच नाहीत तर त्यांनी पापाराझींसाठी एकत्र पोझसुद्धा दिले. तमन्ना आणि विजय ही सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी बनली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आधी तमन्ना एकटीच हातात ट्रॉफी घेऊन फोटोसाठी पोझ देत असते. तेव्हा विजय वर्मा अचानक फ्रेममध्ये येतो, कारण तो तिच्या मागून चालत असतो. मात्र तो थांबून तमन्नासोबत फोटोसाठी पोझ देतो. चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूपच आवडली आहे. तर काहींनी या जोडीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तमन्ना आणि विजय यांचा गोव्यातील पार्टीमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांसोबत एंजॉय करताना, डान्स करताना आणि किस करताना दिसले. त्यानंतर दोघांना मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं.

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. गली बॉय या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.