Sushmita Sen Health: ‘या’ठिकाणी पोहोचल्यानंतर अभिनेत्रीला आला हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याबद्दल 'या' व्यक्तीने दिली मोठी अपडेट... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या प्रकृतीची चर्चा...

Sushmita Sen Health: 'या'ठिकाणी पोहोचल्यानंतर अभिनेत्रीला आला हृदयविकाराचा झटका
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 5:00 PM

मुंबई : अभिनेत्री सुश्मिता सेन कायम तिच्या फिटनेसबाबत जागृत असते. जीम, योगा करत अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्रीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. इस्टाग्रामवर सुश्मिता सेन हिने याबद्दल माहिती दिली. पण आता एका खास व्यक्तीने अभिनेत्रीला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितलं आहे. ‘आर्या ३’ वेब सीरिजमधील अभिनेता विकास कुमार याने आभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र विकास कुमार आणि सुष्मिता सेन यांची चर्चा रंगत आहे.

एका मुलाखतीत विकास कुमार म्हणाला, ‘आर्या ३’ वेब सीरिजच्या महत्त्वाच्या सीनची शूटिंग पूर्ण झाली आहे. सीन राजस्थान येथील आहे. सीरिजमध्ये काही आउटडोर सीन्स आहेत. जे जयपूर याठिकाणी शूट करायचे होते. आम्ही तिथे पोहोचलो, पण दुर्दैवाने सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला आम्हाला याबद्दल माहिती नव्हती, परंतु काही दिवसांनी आम्हाला कळालं, जेव्हा अभिनेत्रीने संपूर्ण जगाला याबद्दल सांगितले.’

हे सुद्धा वाचा

विकास कुमार पुढे म्हणाला, ‘सुरुवातीला तिला (सुष्मिता सेन) काय झालं हे देखील माहिती नव्हतं. सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्या. अभिनेत्रीला झालेल्या आजाराबद्दल काळाल्यानंतर तिने सर्वांना सांगितलं. आम्ही फक्त एक दिवस शूट केलं आणि नंतर आम्हाला कळालं की, आम्ही पुढे शूट करू शकत नाही. यानंतर शूटिंग थांबवण्यात आली.’ असं देखील अभिनेत्याने सांगितलं.

sushmita sen

सुष्मिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘आर्या २’ वेब सीरिजच्या यशानंतर ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे. चाहते ‘आर्या ३’च्या प्रतीक्षेत आहेत. सुष्मिता कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. त्यामुळे अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Sushmita Sen

सुष्मिता सेन कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....