विराट कोहली – अनुष्का शर्मा पोहोचले महाकालेश्वर मंदिरात ; पाहा व्हिडीओ

गेल्या अनेक दिवसांपासून विराट आणि अनुष्का देव-दर्शन करताना दिसत आहेत; आता देखील मलाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी विराट आणि अनुष्का उज्जैन याठिकाणी पोहोचले...

विराट कोहली - अनुष्का शर्मा पोहोचले महाकालेश्वर मंदिरात ; पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:48 AM

Virat Kohli And Anushka Sharma At Mahakal Temple : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, गेल्या अनेक दिवसांपासून दोघे देवदर्शन करताना दिसत आहेत. आता देखील विराट आणि अनुष्का महाकालेश्वर मंदिरात पोहोचले. महाकालेश्वर मंदिरात शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेल्या विराट आणि अनुष्का यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आज सकाळी ४ वाजता विराट आणि अनुष्का मंदिरात आरती करताना दिसले. विराट आणि अनुष्का कायम देवदर्शनासाठी विविध तिर्थ स्थळांना भेट देत असतात.

महाकालेश्वर मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी गेलेल्या विराटने पारंपरिक ड्रेस घातला होता, तर दुसरीकडे अनुष्काने बेबी पिंक रंगाची साडी नेसली आहे. शंकराची आरती करताना विराट आणि अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विराट आणि अनुष्का कायम त्यांची मुलगी वामिका हिच्यासोबत तिर्थ स्थळावर पोहोचतात पण आता दोघे मुलीला न घेता आले आहेत.

मंदिरातून बाहेर आल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. दोघे म्हणाले, ‘याठिकाणी पूजा करण्यासाठी आलो होतो आणि आता महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आहे…’ सध्या सर्वत्र विराट आणि अनुष्का यांच्या व्हिडीओ आणि फोटोंची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्या अनेक चाहत्यांनी दोघांच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. विराट आणि अनुष्का कायम अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. शिवाय दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. विराट आणि अनुष्का यांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडते.

अनुष्का हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अनुष्काच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनुष्का अनेक महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

अनुष्का कायम विराट आणि वामिका यांच्यासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. पण अभिनेत्रीने अद्याप लेक वामिका हिचा चेहरा चाहत्यांना दाखलेला नाही. विराट आणि अनुष्का यांनी वामिका हिच्यासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.