AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट-अनुष्काची खास दिवाळी; व्हिडीओत पुन्हा दिसला बेबी बंप

अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार आहे. अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा असतानाच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय. दिवाळी पार्टीत विराट आणि अनुष्का पारंपरिक पोशाखात दिसले.

विराट-अनुष्काची खास दिवाळी; व्हिडीओत पुन्हा दिसला बेबी बंप
Virat and AnushkaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2023 | 1:52 PM
Share

मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून याची फक्त चर्चा होती. मात्र आता अनुष्काचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय. दिवाळीच्या पार्टीतील हा व्हिडीओ असून यामध्ये विराट आणि अनुष्का पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. पापाराझींनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराट दिवाळी पार्टीसाठी जाताना दिसत आहेत. विराटने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तर अनुष्का यावेळी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. दुपट्ट्याने तिने तिचा बेबी बंप झाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीसुद्धा ते स्पष्ट पहायला मिळतंय.

काही दिवसांपूर्वी अनुष्काला एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर अद्याप अनुष्का किंवा विराट कोहलीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अनुष्का प्रेग्नंसीच्या दुसऱ्या तिमाहीत असून गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात ती याबद्दल जाहीर करेल, असंही म्हटलं जात आहे. वर्ल्ड कप 2023 साठी गुवाहाटीमध्ये वॉर्म-अप मॅचमध्ये व्यग्र असताना विराटला तातडीने मुंबईला यावं लागलं होतं. पर्सनल इमर्जन्सीचं कारण देत तो परतला होता. पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी विराट गुवाहाटीहून मुंबईसाठी इमर्जन्सी फ्लाइटने आला होता.

पहा व्हिडीओ

अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये मुलीला जन्म दिला. वामिका असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. आता लवकरच त्यांच्या कुटुंबात आणखी एका पाहुण्याचं आगमन होणार आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे वर्ल्ड कपमध्ये विराटचा दमदार फॉर्म पहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 9 मॅचमध्ये 110.80 च्या एव्हरेजने 554 धावा काढल्या आहेत. या वर्ल्ड कपमध्ये विराटने दोन वेळा शतक ठोकलं आहे.

अनुष्काच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिकमध्ये झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. दुसऱ्यांदा गरोदर होण्याआधीच या चित्रपटाची पूर्ण शूटिंग पार पडली होती. त्यानंतर आता अनुष्काने काही काळ ब्रेक घेतला आहे.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.