विराट कोहलीच्या मेहुण्याचा ॲमेझॉन-नेटफ्लिक्सशी मोठा करार; तब्बल 400 कोटी रुपयांची केली डील

नुकताच कर्णेश शर्मा आणि अनुष्का शर्मा यांच्या 'क्लिन स्लेट फिल्म्स'ने नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम या दोन मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत मोठा करार केला आहे. हा करार 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

विराट कोहलीच्या मेहुण्याचा ॲमेझॉन-नेटफ्लिक्सशी मोठा करार; तब्बल 400 कोटी रुपयांची केली डील
विराट कोहलीच्या मेहुण्याचा अॅमझॉन-नेटफ्लिक्सशी मोठा करारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 12:05 PM

मुंबई | 23 जुलै 2023 : विराट कोहली हा सर्वांत लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्याचा मेहुणासुद्धा सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव कमावतोय. अनुष्काचा भाऊ आणि विराटचा मेहुणा कर्णेश शर्मा हा इंडस्ट्रीतील यशस्वी चित्रपट निर्माता आहे. कर्णेश हा अनुष्काचा मोठा भाऊ आहे. बहिणीसोबत मिळून त्याने ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत गेल्या दहा वर्षांत बरेच हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.

2013 मध्ये प्रॉडक्शन हाऊसची स्थापना

2013 मध्ये अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा या दोघांनी मिळून स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. आता दहा वर्षांनंतर ‘टॉफलर’च्या मते ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ची कमाई 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. कर्णेशने अनुष्का शर्माला घेऊन काही हिट चित्रपटांची निर्मिती केली. यात फिलौरी आणि NH10 या चित्रपटांचा समावेश आहे. कर्णेशच्या यशाचा हा प्रवास अनुष्काची मुख्य भूमिका असलेल्या NH10 या चित्रपटाच्या निर्मितीपासूनच झाली. 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तशी फारशी कमाई केली नाही. पण गेल्या काही वर्षांतील तो सर्वोत्कृष्ट ॲक्शन थ्रिलर चित्रपट म्हणून ओळखला जातो.

हिट चित्रपटांची निर्मिती

NH10 या चित्रपटाशिवाय त्याने फिलौरी, परी आणि बुलबुल यांसारख्या चित्रपटांचीही निर्मिती केली. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘कला’ या चित्रपटाचंही प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. अनुष्का शर्माच्या आगामी ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटाची निर्मितीही कर्णेश करत आहे. भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

हे सुद्धा वाचा

नेटफ्लिक्स – ॲमेझॉनशी मोठा करार

नुकताच कर्णेश शर्मा आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ने नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम या दोन मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत मोठा करार केला आहे. हा करार 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याअंतर्गत कर्णेश ओटीटी प्लॅटफॉर्मवर आठ चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या डीलमधील पहिला चित्रपट ‘कला’ होता. हा चित्रपट तर हिट ठरलाच पण त्यातील गाण्यांनाही खूप पसंती मिळाली. यापुढे कोणते चित्रपट प्रदर्शित होणार, याची माहिती येत्या काळात प्रेक्षकांना मिळेल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.