Adipurush | ‘आदिपुरुष’ चित्रपटाची वीरेंद्र सेहवागने उडवली खिल्ली; ‘बाहुबली’वरून भन्नाट ट्विट

सर्वसामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी या चित्रपटावर संताप व्यक्त करत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनीही ‘आदिपुरुष’च्या निर्माते-दिग्दर्शकांची शाळा घेतली.

Adipurush | 'आदिपुरुष' चित्रपटाची वीरेंद्र सेहवागने उडवली खिल्ली; 'बाहुबली'वरून भन्नाट ट्विट
Virender Sehwag mocks AdipurushImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 2:53 PM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले. मात्र या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. सोशल मीडियावर या चित्रपटातील डायलॉग आणि सीन्सवरून अजूनही हास्यास्पद मीम्स शेअर केले जात आहेत. रामायण या महाकाव्यावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंह, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रभासचा ‘बाहुबली’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. आता या चित्रपटावरूनच क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

वीरेंद्र सेहवागचं ट्विट-

वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर लिहिलं, ‘आदिपुरुष पाहिल्यानंतर समजलं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं होतं.’ ‘बाहुबली’चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर कटप्पाने बाहुबलीला का मारलं होतं, हा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते. त्याचाच संदर्भ घेत सेहवागने ‘आदिपुरुष’ची खिल्ली उडवली आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हा विनोद खूप जुना झाला, असं एकाने म्हटलंय. तर प्रभासच्या चाहत्यांनी सेहवागवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ट्विट केल्याची टीका केली.

हे सुद्धा वाचा

‘आदिपुरुष’ची कमाई

‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिसाद यायला सुरुवात होताच त्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिस कमाईवर झाला. ‘आदिपुरुष’ने पहिल्या तीन दिवसांत जगभरात 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर कमाईच्या आकड्यात घट पहायला मिळाली. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने भक्त 3.40 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत ‘आदिपुरुष’ची देशभरात 263.30 कोटी रुपये तर जगभरात 362.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

सर्वसामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी या चित्रपटावर संताप व्यक्त करत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनीही ‘आदिपुरुष’च्या निर्माते-दिग्दर्शकांची शाळा घेतली. ही वाढती नकारात्मक प्रतिक्रिया पाहून या चित्रपटातील काही संवादसुद्धा बदलण्यात आले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.