महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा ‘मिश्रा नसून खान असता तर…’, विवेक अग्निहोत्री असं का म्हणाले?
विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका; प्रकरणावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं खळबळजनक ट्विट
मुंबई : विमानात एक धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. एअर इंडियाचा प्रवासी शंकर मिश्रा याने न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या अंगावर लघुशंका केल्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलेच्या अंगावर लघुशंका केल्यामुळे पोलिसांनी मिश्रा याला अटक केली आहे. शंकर मिश्राला अटक केल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी याप्रकरणी एक ट्विट केलं आहे. सध्या अग्निहोत्री याचं ट्विट सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
एका पत्रकाराने ट्विट केल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटवर रिट्विट केलं आहे. ‘महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा ‘मिश्रा नसून खान असता तर काय झालं असतं? या गोष्टीचा खुलासा विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत केला आहे. सध्या त्यांचं ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले विवेक अग्निहोत्री? ‘कायदा सर्वांसाठी समान आहे. एक मीडिया आहे जी भेदभाव करते. माझं ठाम मत आहे, जर याठिकाणी खान असता, तर आपर्यंत तुम्ही त्याला पीडित म्हणून घोषित केलं असतं. या गोष्टींवर एकदा विचार करा आणि व्यक्त व्हा…’ असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
पहिल्या ट्विटमध्ये काय आहे? ‘मद्यधुंद परिस्थितीत शेखर मिश्रा याने महिलेवर लघुशंका केली. मद्यधुंद व्यापारीचं नाव शेखर मिश्रा आहे: त्याचे नाव खान असतं तर? प्राइम टाईम आणि सोशल मीडियावर आक्रोशाचा रथ कोणी चालवला असता? मिश्रा किंवा खान. कायदा सर्वांसाठी समान असायला हवा… प्रतिक्रिया द्या…’ या ट्विटनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
विमानात माहिलेच्या अंगावर लघुशंका केल्यामुळे शंकर मिश्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शंकर मिश्रा हा ‘वेल्स फर्गो’ या अमेरिकेच्या कॅलिफोनिर्जंयात मुख्यालय असलेल्या कंपनीचा भारतातील उपाध्यक्ष होता. शंकरने केलेल्या कृत्यानंतर त्याला कंपनीने पत्रक जारी करून काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.