‘समलैंगिक विवाहची गरज… ‘, Vivek Agnihotri यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
सर्वत्र समलैंगिक विवाहावर चर्चा सुरु असताना ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं लक्षवेधी ट्विट... सध्या सर्वत्र दिग्दर्शकाच्या ट्विटची चर्चा
मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक ठळक मुद्द्यांवर देखील विवेक अग्निहोत्री त्यांचं मत मांडत असतात. विवेक अग्निहोत्री कायम त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता देखील त्यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी समलैंगिक विवाहाचं समर्थन करणारं ट्विट केलं आहे. समलैंगिक विवाह ही गरज आहे, अपराध नाही… असं विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या एका अर्जासंदर्भावर सिनेमा निर्मात्याने प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘समलैंगिक विवाह ही ‘शहरी अभिजात’ संकल्पना नाही. ती मानवी गरज आहे. गाव किंवा छोट्या शहरात कधीही न गेलेल्या सरकारी वर्गातील लोकांनी असा मसूदा तयार केला असेल. असं विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हणाले आहे.
NO. Same sex marriage is not an ‘urban elitist’ concept. It’s a human need. Maybe some sarkari elites drafted it who have never travelled in small towns & villages. Or Mumbai locals.
First, same sex marriage is not a concept. It’s a need. It’s a right. And in a progressive,… https://t.co/M4S3o5InXI
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 18, 2023
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, ‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे समलैंगिक विवाह ही संकल्पना नाही. ती गरज आहे. तो हक्क आहे.आणि भारतासारख्या पुरोगामी, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक सभ्यतेमध्ये समलैंगिक विवाह हा गुन्हा नसून हक्क आहे…’ असं देखील ते ट्विट करत म्हणाले.
केंद्र सरकारच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सांगायचं झालं तर, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, पीएस नरसिम्हा आणि हिमा कोहली यांचा समावेश असलेले सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ समलिंगी विवाहाच्या सामाजिक स्वीकृतीबद्दलच्या त्यांच्या मतांबाबत केंद्राच्या अर्जावर सुनावणी करेल. सध्या सर्वत्र समलैंगिक विवाहावर चर्चा सुरु आहे.