Tunisha Case: तुनिशाची फसवणूक करत होता शिझान? पोलिसांना मिळाली सीक्रेट गर्लफ्रेंडची माहिती; कोण आहे ती?

डिलिट केलेल्या व्हॉट्स ॲप चॅट्समधून उलगडणार तुनिशाच्या आत्महत्येचं कोडं? सीक्रेट गर्लफ्रेंडची होणार चौकशी?

Tunisha Case: तुनिशाची फसवणूक करत होता शिझान? पोलिसांना मिळाली सीक्रेट गर्लफ्रेंडची माहिती; कोण आहे ती?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 12:46 PM

ठाणे: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी वाळीव पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी आता पोलिसांना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. अभिनेता शिझान खानने तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली, असा आरोप तिच्या आईने केला होता. त्यानंतर शिझानला पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी शिझानच्या व्हॉट्स ॲप चॅट्सची तपासणी केली आहे. तुनिशासोबत असताना शिझानच्या आयुष्यात आणखी एक मुलगी होती, यावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केला आहे.

शिझानच्या व्हॉट्स ॲप अकाऊंटवरून तुनिशा आणि त्याचे जुने चॅट्स डिलिट केल्याचं पोलिसांना आढळलं. शिझानच्या आयुष्यात असलेल्या दुसऱ्या मुलीचीही चौकशी पोलीस करू शकतात. सायबर विंगने अद्याप तुनिशाचा फोन अनलॉक केला नाही. तिचा फोन अनलॉक झाल्यानंतर त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल, असा विश्वास पोलिसांना आहे.

हे सुद्धा वाचा

या सर्व प्रकरणाचा खोलवर तपास करण्यासाठी पोलीस शिझानच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतात. दरम्यान वाळीव पोलिसांनी शिझानचा ऑन-कॅमेरा जबाब नोंदवला आहे. जवळपास सात तास शिझानची ऑन कॅमेरा चौकशी झाली.

या चौकशीदरम्यान तो सतत त्याचा जबाब बदलत असल्याचं पोलीस म्हणाले. करिअरवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तुनिशासोबत ब्रेकअप केल्याचं कारण त्याने या चौकशीदरम्यान सांगितलं. याआधी त्याने वयातील अंतर आणि धार्मिक मतमतांतरे यांमुळे ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं.

तुनिशाने शनिवारी दुपारी वसई इथल्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघं ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत एकत्र काम करत होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.